Mystery Girl: भारत- ऑस्ट्रेलिया सामन्यातील ती मिस्ट्री गर्ल कोण? का होतेय तिची चर्चा ?

Mystery Girl In India vs Australia Match: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यादरम्यान मिस्ट्री गर्लची जोरदार चर्चा होतेय, पण ही मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण?
Mystery Girl: भारत- ऑस्ट्रेलिया सामन्यातील ती मिस्ट्री गर्ल कोण? का होतेय तिची चर्चा ?
viral girltwitter
Published On

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील पहिल्या सेमीफायनलचा सामना पार पडला. या सामन्यात भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांनी दमदार कामगिरी करुन वर्ल्डकप २०२३ फायनलचा बदला घेतला. हा सामना भारताने ४ गडी राखून जिंकला.

हा सामना जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल, तर एका तरुणीवर तुमची नजर नक्कीच पडली असेल. सामन्यादरम्यान कॅमेऱ्यामनने त्या तरुणीवर फोकस केलं आणि बघता बघता तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. सोशल मीडियावर व्हायरल होताच, नेटकऱ्यांनी या तरुणीची इंस्टा आयडी शोधायला सुरुवात केली. ही मिस्ट्री गर्ल नेमकी आहे तरी कोण? जाणून घ्या.

Mystery Girl: भारत- ऑस्ट्रेलिया सामन्यातील ती मिस्ट्री गर्ल कोण? का होतेय तिची चर्चा ?
Champions Trophy Final 2025: भारताचा विजय अन् फायनलचं ठिकाण बदललं! केव्हा, कधी अन् कुठे होणार सामना?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना सुरु असताना कॅमेरामनची नजर या तरुणीवर पडली. भारतीय संघाची परिधान केलेली ही तरुणी आपल्या मोबाईलमधून व्हिडिओ रेकॉर्ड करताना दिसून आली. या तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, तुफान व्हायरल होऊ लागला आहे. एका युझरने हा व्हिडिओ शेअर करत, 'ही तरुणी आहे तरी कोण?..'असा प्रश्न विचारला आहे. तर आणखी एका युझरने लिहिले की, 'कॅमेरामन या तरुणीवर फोकस करतोय, पण ही तरुणी आहे तरी कोण..?'

Mystery Girl: भारत- ऑस्ट्रेलिया सामन्यातील ती मिस्ट्री गर्ल कोण? का होतेय तिची चर्चा ?
IND vs AUS: बॅटिंगला येण्याआधीच विराटने इतिहास रचला! या मोठ्या रेकॉर्डमध्ये बनला नंबर १

ती तरुणी आहे तरी कोण?

चॅम्पियन्स ट्रॉफीतील सेमीफायनलदरम्यान व्हायरल झालेली ही तरुणी सोशल मीडियावर आधीपासूनच फेमस आहे. या तरुणीचं नाव पायल असून ती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. पायलचं गेमिंग युट्यूब चॅनेल आहे. या चॅनेलचं नाव पायल गेमिंग असं आहे. तिचे ४ मिलियनहून अधिक सब्क्रायबर्स आहेत. यासह इंस्टाग्रामवरही तिचे४ मिलियनहून अधिक सब्स्क्रायबर्स आहेत. तिच्या इंस्टाग्रामवर रोहित शर्मासोबतचा फोटो देखील आहे.

भारताचा विजय

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. पहिल्या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण डाव २६४ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून विराट कोहलीने शानदार ८४ धावांची खेळी केली. भारताने हा सामना ४ गडी राखून आपल्या नावावर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com