Ladki Bahin Yojana Saam tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: ₹१५०० चा शेवटचा हप्ता, २१०० कधी मिळणार? महायुती सरकार १० दिवसांत लाडक्या बहि‍णींना गिफ्ट देणार

Ladki Bahin Yojana 2100 Rupees Installment: लाडकी बहीण योजनेत महिलांना फेब्रुवारी महिन्यात १५०० रुपये दिले जाणार आहेत. दरम्यान, पुढच्या महिन्यात अर्थसंकल्पात २१०० रुपयांबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीचा हप्ता महिलांना आजपासून देण्यास सुरुवात झाल आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. दरम्यान, लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये देण्याची घोषणा महायुती सरकारने केली होती. हे पैसे कधी मिळणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे. (Ladki Bahin Yojana)

लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीत १५०० रुपये मिळणार आहेत. हा १५०० रुपयांचा कदाचित शेवटचा हप्ता असू शकतो. यानंतर पुढच्या महिन्यापासून महिलांना २१०० रुपये मिळण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे राज्याचा अर्थसंकल्प.

राज्याच्या अर्थसंकल्पात महिलांना लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये देण्याची घोषणा केली जाऊ शकते. याबाबत अनेकदा महायुतीच्या नेत्यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे महिलांना कदाचित मार्चपासून २१०० रुपये मिळू शकतात.जर पुढच्या महिन्यापासून २१०० रुपये मिळाले तर महिलांना खूप आनंद होईल. (Ladki Bahin Yojana Update)

राज्याचा अर्थसंकल्प कधी?

राज्याचा अर्थसंकल्प हा ३ मार्च रोजी सादर केला जाणार आहे. त्यामुळे ३ मार्चला योजनेबाबत निर्णय घेतला जाईल. हा वाढीव निधी देणार की नाही याबाबत अर्थमंत्री अजित पवार घोषणा करु शकतात. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

९ लाख महिला अपात्र

लाडकी बहीण योजनेतून ९ लाख महिला अपात्र होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत साडेपाच लाख महिलांचे अर्ज बाद केले होते. त्यानंतर आणखी २ लाख महिलांचे अर्ज बाद केल्याची माहिती समोर आली होती. यानंतर लाडकी बहीण योजनेत ९ लाख महिलांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. ही आकडेवारी वाढण्याचीदेखील शक्यता आहे. त्यामुळे अपात्र महिलांना आता पुढचा हप्ता मिळणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परभणी जिल्ह्यात 3 दिवसानंतर पुन्हा एकदा जोरदार पाऊस

Hypertension India: २१ कोटी भारतीयांना हाय ब्लड प्रेशरचा धोका! तिशी ओलांडलेल्या तरुणांनो व्हा सावध, WHO नेमकं काय सांगितलं?

आदिवासी समाजाचा मुंबई बंदचा इशारा; 'आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा', हजारो बांधव सहभागी|VIDEO

Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान दोन्हीही संघ होणार मालामाल; आशिया कप विजेत्याला किती पैसे मिळणार? जाणून घ्या प्राइस मनी!

Congress Leader Death : काँग्रेसच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

SCROLL FOR NEXT