ladki bahin yojana  Saam tv
बिझनेस

लाडक्या बहि‍णींसाठी मोठी अपडेट; मकर संक्रांतीच्या दिवशी ३००० रुपये होणार बँक खात्यात जमा? महत्वाची माहिती समोर

ladki bahin yojana scheme 3000 makar sankranti :लाडक्या बहि‍णींसाठी मोठी अपडेट हाती आली आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी ३००० रुपये बँक खात्यात जमा होणार असल्याचा दावा सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांकडून केला जात आहे.

Vishal Gangurde

ऐन निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचा प्रचार जोरात सुरू

मकर संक्रांतीच्या दिवशी लाभार्थ्यांच्या खात्यात 3000 जमा होणार असल्याचा उमेदवारांकडून दावा

लाडकी बहीण योजनेबाबत सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल होत आहे

राज्यातील लाडक्या बहि‍णींना मकर संक्रांतीच्या दिवशी मोठी भेट मिळणार असल्याचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. सत्ताधारी पक्षातील उमेदवार १४ जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात तीन हजार रुपये जमा होणार असल्याचा दावा करत आहे. तर दुसरीकडे या उमेदवारांच्या दाव्यामुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.

राज्यातील सर्व महापालिका निवडणुकीत शिंदेसेना, भाजप आणि अजित पवार गटाकडून लाडकी बहीण योजनेला केंद्रस्थानी ठेवून प्रचार करताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योनजेचे पैसे कधी आणि किती मिळणार याचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहे. मुंबईतील भाजप उमेदवारांकडूनही हे पोस्टर व्हायरल केले जात आहे. त्यामुळे हे उमेदवार आचारसंहितेचा भंग करत असल्याचा दावा विरोधक करत आहेत.

महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर होणार आहे. निवडणुकीच्या मतदानाआधी म्हणजे १४ जानेवारीआधी लाडक्या बहि‍णींच्या बँक खात्यात तीन हजार रुपये जमा होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होणारा दावा हा खरा की खोटा, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

तत्पूर्वी , सत्ताधारी घटकपक्ष काही महापालिकेत सोबत लढत आहेत. तर काही ठिकाणी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढत आहेत.या निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचं श्रेय घेण्यासाठी कुरघोडी करत असल्याचंही पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खिशात ५०-५० ग्रॅम पावडर टाकीन; मुंबई पोलिसाच्या धमकीने खळबळ, DCP ने थेट दिले कारवाईचे आदेश

Assam Flood: आसाममध्ये पावसाचा हाहाकार, पूर- भूस्खलनाने घेतला ४१ जणांचा बळी

Mumbai Rain : भातसा धरण ६५ टक्के भरले, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या कोणत्या धरणात किती साठा?

Maharashtra News Live Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून ५५ हजार क्युसेस पाण्याचा विर्सग सुरू

Rajkummar Rao: 'मोदी है तो मुमकिन है' गाण्यावरून राजकुमार राव ट्रोल; 'तो दबाव तुम्हाला समजणार नाही' म्हणत दिले उत्तर

SCROLL FOR NEXT