Ladki Bahin Yojana Update saam tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana : दिवाळी झाली, भाऊबीजेलाही नाही; लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार? आली नवी अपडेट

LADKI BAHIN YOJANA OCTOBER INSTALLMENT UPDATE : लाडक्या बहिणींना ऑक्टोबरच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. भाऊबीजेला तरी १५०० रुपये खात्यात जमा होतील अशी अपेक्षा होती, पण तेही जमा झाले नाहीत. आता ऑक्टोबरचा हप्ता कधी जमा होणार, असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला आहे.

Saam Tv

राज्यातील महायुती सरकारला लाडक्या बहिणींना दर महिन्याला १५०० रुपये देण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असताना, दिवाळीआधी सप्टेंबरच्या हप्त्याची रक्कम खात्यात जमा करून दिलासा दिला होता. त्याचवेळी ऑक्टोबरचा हप्ता दिवाळीच्या दिवशी किंवा भाऊबीजेच्या दिवशी तरी मिळेल, अशी लाडक्या बहिणींना आशा होती. तीही आता मावळली आहे. ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार, असा प्रश्न आता पडला असून, याबाबतही नवी अपडेट समोर आली आहे.

महाराष्ट्रातील महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरली. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. सप्टेंबर महिन्याचा हप्ता दिवाळीच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला आणि दिवाळी गोड झाली. आता ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार, याकडं बहिणींचं लक्ष लागलं आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्यासंदर्भात नवी माहिती समोर आली आहे. मीडिया वृत्तानुसार, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता भाऊबीजेला मिळणार होता, पण भाऊबीजेच्या दिवशीही लाडक्या बहिणींना गोड भेट मिळाली नाही. आता ऑक्टोबरच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत हप्त्याचे १५०० रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, यासंदर्भात अद्याप सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.

eKYC केली नाही तर खात्यात पैसे जमा होणार नाहीत का?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना आता ईकेवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यावरून विरोधकांनी सरकारवर टीकाही केली होती. दुसरीकडं ईकेवायसी केली नाही तर ऑक्टोबरचा हप्ता मिळणार नाही का, असा प्रश्न लाभार्थी महिलांना पडला आहे. मात्र, लाडक्या बहिणींसाठी दिलासा देणारी बाब म्हणजे सरकारने त्यासाठी दोन महिन्यांचा वेळ दिला आहे. त्यामुळे ईकेवायसी केली नाही तर ऑक्टोबरचा हप्ता मिळणार नाही या चर्चेत काहीही तथ्य नाही. ईकेवायसी केली नाही तर ऑक्टोबरचा हप्ता रोखण्यात येईल, असं सरकारनेही अधिकृतरित्या कुठेही सांगितलेले नाही. त्यामुळे अशा चर्चांमध्ये अजिबात तथ्य नाही.

eKYC कुठे अपडेट कराल?

लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. मात्र, काही ठिकाणी महिलांऐवजी काही पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं उघड झाले आहे. त्यामुळं या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि लाभार्थी महिलांना नियमितपणे आर्थिक मदत मिळण्याच्या उद्देशानं सरकारनं लाभार्थी महिलांसाठी ईकेवायसी करणे अनिवार्य केले आहे. https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या वेबसाइटवर ईकेवायसी अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Famous Couple : "प्रेमाला हळदीचा रंग लागला..."; प्रसिद्ध मराठी जोडपं लवकरच अडकणार लग्न बंधनात, पाहा PHOTOS

Maharashtra Live News Update: शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा

अमेरिकेकडून 'कापूस'कोंडी! बांगलादेशला फक्त ० टक्के, तर भारतावर १८ टक्केंचे आयत शुल्क

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट; सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

Pune Politics: पुण्यात भाजपकडून मोठी कारवाई, ६९ पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन

SCROLL FOR NEXT