Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट!₹1500 की ₹3000, कोणत्या महिन्याचा हप्ता झाला जमा? आताच बॅलेन्स करा चेक

Ladki Bahin Scheme Update: लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना जुलै महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता मिळणार आहे. ३००० रुपये जमा होण्याची चर्चा चुकीची असून, पुढील काही दिवसांत आधार-संलग्न खात्यात रक्कम जमा होईल.

Sakshi Sunil Jadhav

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर जुलै महिन्याच्या सन्मान निधीच्या वितरणाची प्रोसेस सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा होणार की ३००० रुपये याबाबत सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.

राज्य सरकारकडून सध्या फक्त जुलै महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता वितरित केला जात आहे. जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे मिळून ३००० रुपये एकाचवेळी जमा होतील, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. मात्र, सध्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता देण्यात आलेला नसून पात्र महिलांना जुलै महिन्याचेच १५०० रुपये मिळणार आहेत.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, जुलै महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रोसेस सुरू झाली आहे. पुढच्या २ ते ३ दिवसांत पात्र लाभार्थी महिलांच्या आधारशी लिंक असलेल्या बँक खात्यात हा निधी जमा होणार आहे. त्यामुळे महिलांनी आपल्या बँक खात्यातील शिल्लक तपासण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

१ कोटी ६६ लाख महिलांना लाभ

लाडकी बहिण योजनेचा लाभ राज्यातल्या तब्बल १ कोटी ६६ लाख महिलांना मिळणार आहे. पुणे, सोलापूर, बीडसह विविध जिल्ह्यांतल्या काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचे मेसेजही आले आहेत. निधी टप्प्याटप्प्याने खात्यांमध्ये जमा केला जाणार आहे.

दरम्यान, अर्जांची छाननी आणि e-KYC प्रोसेसनंतर ९२ लाख महिला अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे योजनेच्या नियमांची पूर्तता करणाऱ्या पात्र महिलांनाच सध्याचा हप्ता मिळणार आहे. थोडक्यात सांगायचं तर, सध्या ३००० रुपये नाही तर जुलै महिन्याचे १५०० रुपये खात्यात जमा होणार आहेत. ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबतची स्वतंत्र माहिती सरकारकडून जाहीर झाल्यानंतरच त्याची रक्कम स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Update : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? सर्वोच्च सुनावणीला सुरूवात

Traditional Saree Designs: गौरीसाठी 7 सुंदर साड्या; अस्सल पारंपरिक लूकसाठी ठरतील बेस्ट

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीमध्ये चोराला मराठा आंदोलकांनी दिला बेदम चोप

Healthy Drink: १५ दिवस लिंबू- लसून अन् हळदीचे पाणी प्यायल्याने काय होते?

Gold Rate : दिवाळी-दसऱ्यात दिवाळं निघणार, सोनं ५० हजारांनी महागणार; तज्ज्ञांच्या अंदाजाने सराफा बाजारात खळबळ

SCROLL FOR NEXT