Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: नवीन वर्षात लाडक्या बहिणींवर संक्रांत; ६० लाख महिलांचे अर्ज बाद होणार

Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेत महिलांना १५०० रुपये दिले जातात. या योजनेत आता ६० लाख महिलांचे अर्ज बाद होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजना ही खूप लोकप्रिय झाली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. या योजनेत आता लवकरच महिलांना २१०० रुपये दिले जाणार आहे. मात्र, त्याआधीच ६० लाख महिलांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. याबाबत शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांनी मोठ वक्तव्य केलं आहे. (Ladki Bahin Yojana)

काल छगन भुजबळ यांनी अपात्र लाडक्या बहि‍णींना स्वतः हून नावे काढायला सांगितले होते. जर त्यांनी स्वतः हून या योजनेतून नावे काढली नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता लाडकी बहीण योजनेत अपात्र महिलांवर कारवाई होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.दरम्यान या चर्चा सुरु असतानाच ६० लाख महिलांचे अर्ज बाद होणार असल्याचे विनायक राऊत यांनी सांगितले. (Ladki Bahin Yojana Update)

अपात्र महिलांचे अर्ज बाद होणार आहे. ६० लाख महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहेत.पहिल्या टप्प्यात ६० लाख महिला या योजनेपासून वंचित होणार आहे. त्यांचे पैसे परत घेतले जाणार आहेत, असं विनायक राऊत यांनी सांगितले आहे.

लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जाची काटेकोरपणे तपासणी केली जाणार आहे. या तपासणीत महिला पात्र नसतील तर त्यांना या योजनेतून अपात्र केले जाणार आहेत. त्यामुळे ज्या महिला पात्र नाहीत तरीही त्यांनी या योजनेचा लाभ घेतला त्यांना पैसे परत करावे लागणार असल्याचे म्हटले आहे.

याबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, लाडकी बहीण योजना आमचं सरकार सुरु ठेवणार आहे. या योजनेत जर कोणी नियमाच्या बाहेर जाऊन पैसे घेतले असतील तर त्यांचे अर्ज बाद केले जाऊ शकतात.

यानंतर आता अपात्र लाडक्या बहि‍णींवर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेत लाभ मिळणार नाही. ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत काम करत असतील त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. चारचाकी वाहन असणाऱ्या महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे निकषांबाहेर जाऊन जर तुम्ही योजनेाचा लाभ घेत असाल तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TMKOC: 'तिच्या सासरचे नाही...'; 'तारक मेहता'मध्ये कधीच परत येणार नाही दया बेन, अभिनेत्रीने केला मोठा खुलासा

Maharashtra Live News Update: भोंदू अशोक खरातला १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी

Petrol Diesel Price Hike: सिलेंडरनंतर प्रीमियम पेट्रोल-डिझेलच्या किमती पुन्हा वाढल्या, वाचा नवे दर

Chia seeds: या व्यक्तींनी चुकूनही चिया सिड्सचं सेवन करू नये!

ग्रामीण भागातील लाडक्या बहिणींसाठी सरकारने आणली जबरदस्त योजना; आता महिलांना मिळणार २४ लाख रुपये

SCROLL FOR NEXT