Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय! या महिलांकडून ₹१५०० परत घेणार

Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेतून अनेक महिलांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे. हजारो सरकारी कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे. या महिलांकडून पैसे परत घेतले जात आहे.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी

लाभार्थी सरकारी कर्मचाऱ्यांकडून पैसे वसूल केले

आतापर्यंत ११ कोटी रुपये वसूल केले

लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने आता लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नसतानाही लाभ घेतलेल्यांवर कारवाई करण्याचे ठरवले आहे. लाडकी बहीण योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्यांकडून पैसे वसूली केली आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, सरकारने आतापर्यंत लाभार्थ्यांकडून ११ कोटी रुपये वसूल केले आहे. या योजनेत अनेकांनी निकषात बसत नसतानाही लाभ घेतला आहे. धक्कादायक म्हणजे हजारो सरकारी कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे. सरकारी कर्मचारी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.

कारवाई होईल या भीतीने काही लाभार्थ्यांनी स्वतः च्या इच्छेने पैसे परत केले आहेत. त्यांनी योजनेतून आपली नावे काढून टाकली आहेत. धक्कादायक म्हणजे, हजारो पुरुषांनीही या योजनेचा लाभ घेतला आहे. ऑक्टोबर २०२५ पर्यंत, जवळपास १२,४३१ पुरुष आणि ७७,९८० अपात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले होते. या महिलांना तब्बल १६४.५२ कोटी रुपये देण्यात आले आहेत.

महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार यांनी याबाबत माहिती दिली आहे. पुरष लाभार्थ्यांकडून लवकरच वसुली केली जाईल, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या अनियमिततेला केवळ सुरुवात म्हटलं आहे. भविष्यात मोठे घोटाळे उघड होऊ शकतात.

सध्या योजनेअंतर्गत १.५७ कोटी महिला लाभार्थी आहेत. योजनेसाठी ३६,००० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या योजनेत ईकेवायसीची मुदत वाढवण्यात आली आहे. आता महिला ३० एप्रिल २०२६ पर्यंत केवायसीमध्ये दुरुस्ती करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP Protest: कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन कधीपर्यंत सुरू राहणार? अभिजीत दीपकेने दिली महत्वाची अपडेट, सरकारला दिला थेट इशारा

Pune IT Job Scam: पुण्यात आयटी नोकरीच्या आमिषाने मोठा घोटाळा; ३०० हून अधिक तरुणांची फसवणूक, कॉर्पोरेट क्षेत्रात खळबळ

Maharashtra News Live Update: वादळी वाऱ्यामुळे केळीची बाग भुईसपाट

झेरॉक्सला मराठीत काय म्हणतात?

Nashik : नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार , अल्पवयीन मुलीची प्रसूतीनंतर बाळ विकलं; दोन नामांकीत डॉक्टरांसह ११ जणांना ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT