Ladki Bahin Yojana Update Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची बातमी! e-KYC साठी शेवटचे १० दिवस, फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार?

Ladki Bahin Yojana eKYC Update News : लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च आहे. फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता असून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पैसे खात्यात जमा होऊ शकतात.

Namdeo Kumbhar

Maharashtra Ladki Bahin Yojana payment update February April 2026 : लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातील पडताळणीसाठी आता केवळ शेवटचे १० दिवस शिल्लक आहेत. ३१ मार्चपर्यंत लाभार्थ्यांची अंतिम यादी निश्चित केली जाणार आहे. तर अपात्र महिलांची संख्याही वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत ४५ लाखांपेक्षा जास्त महिलांना या योजनेतून वगळण्यात आलं आहे. अटी आणि नियमांचं पालन न करणाऱ्या लाडक्या बहिणींवर कडक कारवाई देखील करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. ईकेवायसी अखेरच्या टप्प्यात आहे, पण जानेवारीनंतर लाडकीच्या खात्यात एकही हप्ता आलेला नाही. (Ladki Bahin Yojana eKYC last date March 31 details)

एकत्र ३ हजार खात्यात येणार ? when will February March installment be credited Ladki Bahin yojana

३१ मार्च रोजी लाडकी बहीण योजनेसाठी ई केवायसी करण्याची मुदत संपणार आहे. ईकेवायसीला मुदतवाढ दिल्यानंतर लाडक्या बहि‍णींच्या खात्यात पैसे आलेले नाहीत. त्यामुळे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार? याची प्रतिक्षा लाडक्या बहिणींकडून केली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, लाडकीच्या खात्यात दोन महिन्याचे तीन हजार रूपये एकत्र येण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अथवा १० एप्रिलपर्यंत लाडकीच्या खात्यात पैसे येऊ शकतात. ईकेवायसीनंतर अर्जांची पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतर पात्र महिल्यांच्या खात्यात हप्ता वितरण केला जाईल, असे सांगण्यात येत आहे.

१५०० चा लाभ बंद होण्याची भीती -

लाडकी बहीण योजनेसाठी ई केवायसी करण्यासाठी अखेरचे १० दिवस शिल्लक आहेत. पण अपुरी कागदपत्रे अथवा इतर कारणांमुळे काही महिलांना मुदतीत प्रक्रिया पूर्ण करता येत नाही. त्यामुळे अपात्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक महिलांना १५०० रूपयांचा लाभ बंद होण्याची भीती सतावत आहे. ईकेवायसी केली नाही, तर पात्र असतानाही १५०० रूपये बंद होणार आहेत. कारण, त्यांचे नाव लाडक्या बहि‍णींच्या यादीतून वगळले जाणार आहे. त्यामुळे अनेक लाभार्थी महिला चिंतेत आहेत. त्यामुळे ईकेवायसीची मुदत संपण्यास १० दिवसच शिल्लक राहिलेले असल्याने या ई-केवायसीमध्ये बदल करण्याची लगबग सुरू झाली आहे.

दुरूस्तीसाठी अखेरचे १० दिवस -

राज्य सरकारने फेब्रुवारीच्या पहिल्य आठवड्यात राज्यातील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक जीआर काढला होता. केवायसी करताना काही माहिती अनवधानाने चुकीची भरली गेली असेल तर बदल करण्याची अखेरची संधी देण्यात आली होती. यामध्ये बदल करण्यासाठी आता अखेरचे १० दिवस शिल्लक राहिले आहेत. अनेक महिलांनी चूक दुरूस्त केलेली आहे, पण काही महिलांना अद्याप अपुऱ्या कागदपत्रांमुळे अथवा इतर कारणांमुळे दुरूस्ती करता आलेली नाही. त्यांचा प्रति महिना १५०० रूपयांचा लाभ बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur : कोल्हापूर विद्यापीठातील विद्यार्थिनीने संपवलं आयुष्य, कॉलेजच्या वस्तीगृहातच घेतला गळफास

'झिम्मा' चा खेळ पुन्हा रंगणार; सिद्धार्थ चांदेकर नव्या ट्रिपसाठी तयार, Jhimma 3 ची 'या' तारखेला होणार थिएटरमध्ये एन्ट्री

Viral video: धक्कादायक! रील्स बघून मुलांनी बनवली जीवघेणी वस्तू; व्हिडिओ पाहून पालकही झाले हैराण

Maharashtra Live News Update : दीपक केसरकर यांची एसआयटी चौकशी करा- विनायक राऊत

Yavatmal Crime: शेजाऱ्याच्या घरातील पोत्यात आढळला बेपत्ता ७ वर्षीय मुलीचा मृतदेह |Video

SCROLL FOR NEXT