Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: ७१ लाख लाडक्या बहि‍णींना यापुढे कधीच मिळणार नाहीत ₹१५००; नेमकं कारण काय?

Ladki Bahin Yojana 71 Lakh Women Installment Stopped : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसीतील दुरुस्तीसाठी मुदतवाढ दिली आहे. मात्र, त्याआधीच लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी

७१ लाख महिलांचा अर्ज बाद

यापुढे कधीच मिळणार नाहीत ₹१५००

महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना चांगलीच चर्चेत आली आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता लाडकी बहीण योजनेच्या केवायसीतील दुरुस्तीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान,मीडिया रिपोर्टनुसार, त्याआधीच ७१ लाख लाडक्या बहि‍णींचा लाभ बंद झाल्याची बातमी समोर आली आहे. या महिलांना यापुढे कधीच १५०० रुपये मिळणार नाहीत.

७१ लाख लाडक्या बहिणींचा अर्ज बाद (Ladki Bahin Yojana 71 Lakh Women Ineligible)

लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळतात. दरम्यान सुरुवातीला जेव्हा योजना सुरु झाली होती तेव्हा लाभार्थी महिलांची संख्या २.४ कोटी होती. यानंतर लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. सध्या या योजनेच्या फक्त १ कोटी ७५ लाख लाभार्थी महिला आहेत. लाडकी बहीण योजनेत ९० लाख महिलांनी केवायसी पूर्ण केली असल्याची माहिती समोर आली आहे. ज्या महिलांनी केवायसी केली नाही त्यांचा लाभ कायमचा बंद झाला आहे.

लाडक्या बहिणींचा लाभ बंद करण्याची कारणे (Why Ladki Bahin Yojana Installment stopped Reasons)

लाडकी बहीण योजना सुरु झाली तेव्हा सरकारने सरसकट सर्व लाभार्थी महिलांना लाभ दिला. त्यानंतर महिलांची पडताळणी करण्यात आली. यामध्ये ज्या महिला निकषात बसत नाही त्यांचा लाभ बंद करण्यात आला. त्यानंतर लाभार्थी महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले होते. केवायसी न केलेल्या महिलांचाही लाभ बंद करण्यात आला आहे. याचसोबत अनेक महिलांनी केवायसीमध्ये चुका केल्या आहेत. त्यांचा लाभ तात्पुरता बंद करण्यात आला आहे. भविष्यात चुका सुधारल्यानंतर त्यांचा लाभ पुन्हा सुरु केला जाईल. केवायसीतील दुरुस्तीसाठी ३० एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे महिलांनी तोपर्यंत केवायसी पूर्ण करायची आहे.

७१ लाख महिलांचा लाभ सध्या बंद करण्यात आला आहे. यातील काही महिला निकषात बसत नाही तर काहींनी केवायसी केली नाही. प्रत्यक्ष पडताळणीमध्ये या महिला अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे या महिलांना यापुढे कधीच १५०० रुपयांचा लाभ मिळणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fansachi Rassa Bhaji Recipe : कोकणात बनवतात तशी फणसाची झणझणीत रस्सा भाजी, चाखाल अस्सल गावरान चव

MNS: मनसेत मोठी उलटफेर; शिंदे गटानंतर आता राज ठाकरेंनीही पक्षात फिरवली भाकरी

Maharashtra Live News Update : पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतीचं मोठं नुकसान

Dhurandhar 2 : ४८ डिग्री तापमान, २० दिवस शूटिंग; रणवीर सिंहने 'असा' शूट केला 'धुरंधर २'चा क्लायमॅक्स, किस्सा वाचून थक्क व्हाल

Ashok Kharat: भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती, भोंदू खरातचा अनोखा कारनामा; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था पोलिसांच्या रडारवर

SCROLL FOR NEXT