Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत किती पैसे खर्च? आकडा वाचून पायाखालची जमीन सरकेल

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली. या योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. दरम्यान, या योजनेसाठी आतापर्यंत कोट्यवधींचा खर्च करण्यात आला आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेला वर्षपूर्ती

लाडकी बहीण योजनेसाठी कोट्यवधी रुपये खर्च

आतापर्यंत किती रुपये खर्च

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूपच लोकप्रिय झाली आहे. कोट्यवधी महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. या योजनेला वर्षपूर्ती झाली आहे. या योजनेसाठी राज्य सरकारने कोट्यवधी रुपये खर्च केले आहे. या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर ताण आल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, सरकारने मागच्या वर्षभरात या योजनेसाठी ४३ हजार कोटी रुपये खर्च केले आहे. आरटीआयमध्ये याबाबत माहिती उघड झाली आहे.

जुलै २०२४ ते जून २०२५ या कालावधीत जवळपास ४३,०४५.०६ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. दर महिन्याना कोट्यवधी रुपयांचा निधी वितरित केला जातो. लाभार्थी महिलांच्या खात्यात प्रत्येकी १५०० रुपये जमा केले जातात. दरम्यान, आतापर्यंत किती निधी वितरीत झाला हे जाणून घ्या.

लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने ३६००० कोटी रुपयांचा निधी ठेवला होता. मात्र, सरासरी ३,५८ कोटी रुपये खर्च झाला. त्यामुळे तेव्हापासून सरकारी तिजोरीवर ताण पडण्यास सुरुवात झाली.

कोणत्या महिन्यात किती रुपये खर्च (Ladki Bahin Yojana Expenses)

जुलै २०२४ ते जून २०२५ या काळात ४३,०४५.०६ कोटी रुपये वितरीत करण्यात आले

एप्रिल महिन्यात सर्वाधिक महिला लाभार्थी होत्या. २.४७ लाख महिलांना १५०० रुपये देण्यात आहे.

जून महिन्यात लाभार्थी महिलांची संख्या कमी झाली. पडताळणीमधून हजारो महिलांना बाद करण्यात आले.

योजनेतून ७७,९८० महिला बाद करण्यात आल्या त्यामुळे सरकारची ३४०.४२ कोटींची बचत झाली.

लाडकी बहीण योजनेचा निधी हा ठरवलेल्यापेक्षा जास्त लागला आहे. त्यामुळे सरकारी तिजोरीवर ताण आला आहे. याचा परिणाम इतर योजनांवरदेखील झाला आहे. इतर अनेक योजना बंद करण्यात आल्या आहेत. दरम्यान, ही योजना बंद होणार की काय असा प्रश्न विचारला जात होता. मात्र, ही योजना सुरु राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सरकार गरिबांना देणार 46 हजार रुपये? अर्थमंत्रालय गरिबांना आर्थिक मदत देणार?

वसंतदादा शुगर इन्स्टीट्युटची चौकशी, VSIचं ऑडिट की अजितदादा टार्गेट?

Maharashtra Live News Update: एसटी महामंडळ बस आणि कारचा अपघात

Bihar Elections : लाडक्या बहि‍णींना २५०० रुपये, मोफत वीज, सरकारी नोकरी; इंडिया आघाडीच्या जाहीरनाम्यात नेमकं काय?

उपराज्यपालांच्या नातवाची आत्महत्या; कानपूरमध्ये सापडला मृतदेह,चिठ्ठीतून उलगडणार सत्य

SCROLL FOR NEXT