Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: ...तोपर्यंत फेब्रुवारीचे १५०० रुपये मिळणार नाहीत; लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलं!

Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. महिला मार्च महिन्याच्या हप्त्याच्या प्रतिक्षेत आहेत. पडताळणी झाल्यानंतरच महिलांना हप्ता देण्यात येणार आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची सध्या पडताळणी सुरु आहे. लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत ५ लाख महिलांना अपात्र करण्यात आले आहे. यामध्ये इतर योजनांचा लाभ घेत असलेल्या महिलांचा समावेश आहे. तसेच चारचाकी असणाऱ्या महिलांचाही समावेश आहे. दरम्यान, आता पात्र महिलांना पैसे कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, आता सर्व महिलांच्या अर्जांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच महिलांना पैसे मिळणार असल्याची माहिती आता समोर आली आहे.(Ladki Bahin yojana)

लाडकी बहीण योजनेअंतर्गत तालुका, जिल्हास्तरीय समितीकडून अर्जांची पडताळणी होऊ शकली नाही. विधानसभा निवडणुकीनंतर योजनेसंदर्भात अनेक तक्रारी येत होत्या. त्यामुळे आता अर्जांची पडताळणी सुरु झाली आहे. पाच टप्प्यांमध्ये ही पडताळणी होणार आहे. सध्या चारचाकी वाहनांची पडताळणी सुरु आहे. (Ladki Bahin Yojana)

पडताळणीचा अहवाल आठ दिवसांत सादर केली जाणार आहे. त्यानुसार अपात्र ठरलेल्या बहि‍णींबाबतचा निर्णय राज्यस्तरावरुनच होणार आहे. त्यानंतर लाडक्या बहि‍णींना फेब्रुवारीचा हप्ता दिला जाणार आहे. परंतु आता पडताळणी होण्यासाठी वेळ लागेल. त्यामुळे हप्त्यासाठी मार्च उजाडेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत साडेपाच लाख महिलांचे अर्ज बाद ठरले आहेत. यामध्ये उत्पन्न, चारचाकी वाहन असलेल्या महिलांचा समावेश आहे. याचसोबत काही महिलांनी संजय गांधी निराधार योजना आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Pune Train: पुणे-मुंबईकरांना मोठा दिलासा, १० दिवसांनतर रेल्वे रूळावर; कोणकोणत्या ट्रेन सुरू झाल्या?

Maharashtra News Live Update: पीकविमा अर्जातील नव्या हमीपत्रामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

Rain Update : राज्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट; तुमच्या भागातील हवामानाचा अंदाज काय? वाचा

Satara Tourism : महाराष्ट्रातील 'मिनी काश्मीर' म्हणून ओळखलं जाणारं हे ठिकाण पाहिलं का? पावसाळ्यात दिसते अधिकच सुंदर

Akshay Kumar : अक्षय कुमारचे भीतीदायक हास्य तर सैफ अली खानच्या डोळ्यात आग; 'हैवान'चा फर्स्ट लूक आऊट, रिलीज डेट काय?

SCROLL FOR NEXT