Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींचे टेन्शन वाढवणारी बातमी! 'या' महिलांना मिळणार नाही एप्रिलचा हप्ता

Majhi Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेत आता काही महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार नाहीये. ज्या महिला निकषांमध्ये बसत नाही, अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) नेहमीच चर्चेत असते.लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. या योजनेत आता महिला एप्रिलच्या हप्त्याची वाट बघत आहेत. आतापर्यंत महिलांना ९ हप्ते वितरीत करण्यात आले आहेत. दरम्यान, लाडकी बहीण योजनेत आता या महिलांना एप्रिलचा हप्ता मिळणार नाही.

कोणाला एप्रिलचा हप्ता मिळणार नाही? (These Women Will Not get April Installment)

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी काही निकष आहेत. या निकषात ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. यामध्ये महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त नसावे. महिलांच्या घरात चारचाकी वाहन नसावे. महिला सरकारी नोकरी करत नसाव्यात. महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असावी, असे निकष आहेत.

या सर्व निकषांमध्ये ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे.ज्या महिला या निकषात बसत नाही तरीही त्यांनी अर्ज केला अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये. आतापर्यंत ९ लाख महिलांना योजनेतून बाद केले आहेत. मार्च महिन्यात ज्या महिलांचे अर्ज बाद केले आहेत त्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज अपात्र झालेत त्यांना पैसे मिळणार नाहीत.

एप्रिलचा हप्ता कधी येणार? (Ladki Bahin Yojana April Installment Date)

लाडकी बहीण योजनेत एप्रिलचा हप्ता कधी येणार याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. परंतु एप्रिलच्या शेवटच्या दोन आठवड्यात कधीही पैसे येऊ शकतात. लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता लांबण्याची शक्यता आहे. अद्याप लाडक्या बहि‍णींच्या उत्पन्नाबाबत पडताळणी झालेली नाही. त्यामुळे कदाचित महिलांचा हप्ता लांबणीवर जाऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NEETचा पेपर कसा फुटला? यश यादवकडे कुठून आला पेपर?

Chanakya Niti: यशस्वी व्यक्ती कसं बनायचं? गाढवाच्या या ५ गुणांपासून घ्या प्रेरणा, चाणक्यांचा सल्ला वाचा...

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

SCROLL FOR NEXT