Ladki Bahin Yojana Updates Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: त्या लाडक्या बहिणींना या महिन्यापासून १५०० रुपये मिळणार नाही; आदिती तटकरेंनी कारणही सांगितलं

These Women will not get Ladki Bahin Yojana Installment: लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत ५ लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या महिलांना जानेवारीपासून १५०० रुपये मिळणार नाहीत.

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे. लाडकी बहीण योजनेचा कोट्यवधी महिलांनी लाभ घेतलेला आहे. या योजनेत आतापर्यंत जवळपास ५ लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरु आहे. अपात्र महिलांना आता यापुढे हप्ता मिळणार नाही. (Ladki Bahin Yojana)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता अपात्र महिलांना जानेवारीपासूनचा हप्ता मिळणार नाही. त्यामुळे आता जवळपास ५ लाख महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही.

लाडकी बहीण योजनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. पडताळणी झाल्यावर अपात्र महिलांकडून दिलेला लाभ परत घेणार का असाही प्रश्न विचारण्यात येत होता. मात्र, या योजनेतून कोणत्याही महिन्याचे पैसे परत घेतले जाणार नसल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले आहे. (Ladki Bahin Yojana Update)

कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला निधी परत घेणे उचित ठरणार नाही. म्हणून कोणत्याही लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत (जुलै २०२४-डिसेंबर २०२४) देण्यात आलेली रक्कम परत घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावरुन दिली आहे.

लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी सुरु झाली आहे. महिलांच्या घरी चारचाकी वाहने आहेत की नाही याची तपासणी घरोघरी जाऊन केली जाणार आहे. याचसोबत आयकर विभागाच्या मदतीने उत्पन्न जास्त असलेल्या महिलांच्या अर्जांची तपासणी केली जाणार आहे. तसेच ज्या महिलांनी दुसऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला आहे. त्यांनाही योजनेतून वगळण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ketan Agarwal Case: जीव घेणे सोपं झालं का? पुण्यातल केतन अग्रवाल हत्या प्रकरणावर प्रसिद्ध अभिनेत्री संतापली

Nandurbar : हृदयद्रावक! इकडे बहिणीचा जन्म आणि दुसरीकडे भावाचा मृत्यू; माऊलीच्या आक्रोशाने सातपुडा सुन्न

Maharashtra News Live Update: भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक आमने-सामने, जोरदार घोषणाबाजी

पावसाळ्यात दही खाल्ल्याने सर्दी-खोकला होतो का? Should You Eat Curd During Monsoon

Eexcessive sleepiness: सतत झोप येतेय? या 7 धक्कादायक कारणांमुळे तुमचं शरीर देतंय मोठा इशारा

SCROLL FOR NEXT