Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहि‍णींना ऑगस्टचे ₹१५०० मिळणार नाहीत, कारण काय? अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स

Ladki Bahin Yojana Payment Status Check Online Process: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ऑगस्टचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता जमा होण्यास सुरुवात

या महिलांना मिळणार नाहीत १५०० रुपये

लाडकी बहीण योजनेचा स्टेट्स अशा पद्धतीने करा चेक

लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी याबाबत घोषणा केली आहे. अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. दरम्यान, अजूनही काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. येत्या दोन दिवसांत उर्वरित महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील. परंतु लाखो महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीयेत. यामागचे कारण जाणून घ्या.

या लाडक्या बहि‍णींना मिळणार नाहीत पैसे (These Women Cannot Get Ladki Bahin Yojana Benefit)

लाडकी बहीण योजनेत जवळपास अडीच कोटींपेक्षा जास्त महिलांनी अर्ज केले होते. त्यातील काही महिलांनी निकषांबाहेर जाऊन लाभ घेतला होता. त्यांच्या अर्जांची पडताळणी करण्यात आली आहे. त्यातून लाखो महिलांना बाद करण्यात आले आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी काही दिवसांपूर्वी माहिती दिली होती की, २६ लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.या महिलांना पैसे मिळणार नाहीयेत.

लाडक्या बहि‍णींना पैसे न मिळण्याची कारणे

लाडकी बहीण योजनेत २१ ते ६५ वयोगटातील महिला लाभ घेऊ शकतात. त्यापेक्षा जास्त वयोगटातील महिलांना बाद केले आहे.

ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही.

सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही.

चारचाकी वाहन असलेल्या कुटुंबातील महिलांनाही योजनेचा लाभ मिळणार नाही.

एका कुटुंबातील फक्त दोनच महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे.

स्टेट्‍स कसा चेक करायचा? (Ladki Bahin Yojana Payment Status Check Online)

  • सर्वात आधी तुम्हाला राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जायचे आहे.

  • यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या सेक्शनवर क्लिक करायचे आहे.

  • यानंतर चेक पेमेंट स्टेट्सवर क्लिक करा.

  • यानंतर तुमचा आधार नंबर आणि बेनिफिशियरी आयडी टाका.

  • यानंतर तुम्हाला सर्व पेमेंट स्टेट्‍स दिसणार आहे.

  • याचसोबत फोन नंबरशी लिंक असणाऱ्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा झालेत की नाही चेक करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashmika Mandanna Photos : ये लाल इश्क; अनारकली ड्रेसमध्ये रश्मिकाचं हिऱ्यासारखं लखलखतं सौंदर्य

Weak Relationship: नवरा- बायकोमधील या ६ चुकांमुळे नात्याचा होतो शेवट

Maharashtra Live News Update: घस्थापनेआधी तुळजाभवानी देवीचे व्हीआयपी दर्शन महाग

Dilip Prabhavalkar: 'कलाकार झालो, पण बाबा नव्हते...'; अभिनय करण्यासाठी पाठिंबा देणाऱ्या वडीलांच्या आठवणीत दिलीप प्रभावळकर भावुक

हायवे, रेल्वे, लोकल अन् मेट्रो... नवी मुंबई विमानतळावर कोणत्या मार्गानं कसं जाल? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT