Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहिणींना कधीच मिळणार नाही १५०० रुपये, तुमचंही नाव आहे का?

Majhi Ladki Bahin Yojana These Women Will not Get Benefit: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता अनेक महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाहीये.

Siddhi Hande

  • लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट

  • अनेक महिलांना मिळणार नाही १५०० रुपये

  • यापुढे कधीही मिळणार नाही योजनेचा लाभ

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आता लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. या महिलांना कधीच लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाहीये. या योजनेत निकषांबाहेर जाऊन अनेक महिलांनी अर्ज केले आहेत. त्यामुळे या महिलांना आता यापुढे कधीच लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाहीये.

कोणाला मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचा लाभ? (These Women Will Not Get Benefit of Scheme)

लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी सुरु आहे. यामध्ये अनेक महिलांनी नियमांबाहेर जाऊन अर्ज केले आहेत. जवळपास साडे नऊ हजार सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांचे अर्ज बाद केले आहेत.

याचसोबत अनेक महिलांनी उत्पन्नाची खोटी माहिती देऊन योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त असतानाही योजनेअंतर्गत पैसे घेतले आहे. काही महिलांकडे चारचाकी वाहन आहे तर काही महिला इतर सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे या महिलांना आता योजनेतून वगळण्यात आले आहे.

आतापर्यंत जवळपास ४२ लाख महिलांचे अर्ज बाद केले अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे या महिलांना इथून पुढे कधीही लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. या महिलांच्या खात्यात १५०० रुपये येणार नाहीत.

जर तुम्ही योजनेच्या निकषात बसत नसाल आणि योजनेचा लाभ घेतला असेल तर तुमचाही अर्ज रद्द केला जाऊ शकतो. त्यामुळे जर तुम्हाला पुढच्या महिन्यात पैसे आले नाही तर तुमचा अर्ज बाद केलेला असू शकतो.

लाडकी बहीण योजना कोणी सुरु केली?

लाडकी बहीण योजना २०२४ मध्ये सुरु करण्यात आली होती. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही योजना सुरु केली होती.

लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत किती पैसे जमा झाले?

लाडकी बहीण योजनेचा एक वर्ष पूर्ण झाले आहेत. या योजनेत दर महिन्याला १५०० रुपये जमा केले जातात. म्हणजेच आतापर्यंत महिलांना १८००० रुपये मिळाले आहेत.

किती महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचा लाभ?

आतापर्यंत ४२ लाख महिलांचे अर्ज बाद केले असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी २६ लाख महिलांचे अर्ज बाद केले असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar: मोठी कारवाई! महिला महसूल अधिकाऱ्याला अटक, लाच घेताना रंगेहाथ पकडलं

१००० अनधिकृत चाळी, ६००कोटींची उलाढाल; चाळ माफिया आणि अधिकाऱ्यांवर कारवाई कधी?

Maharashtra News Live Update: वादळी वाऱ्याचा फटका; छत्रपती संभाजीनगर विमानतळाचे छप्पर कोसळले, मोठी दुर्घटना टळली

काय वेळ आलीय! पेट्रोल पंपावर पोलीस बंदोबस्त, कॅनमध्ये डिझेल देण्यास आजपासून बंदी, VIDEO

Mumbai Crime News: किरकोळ कारणावरून जोडप्यात वाजलं; वादातून पतीनं पत्नीच्या पोटात लाथ मारली अन्... होत्याचं नव्हतं झालं

SCROLL FOR NEXT