Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: 'त्या' लाडक्या बहि‍णींच्या खात्यात जमा झाले १०५०० रुपये; कुणाला किती मिळाले?

Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेत महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता देण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना आतापर्यंत १०५०० रुपये मिळाले आहेत.

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेत महिलांना जानेवारी महिन्याचे १५०० रुपये दिले आहेत. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळतात. लवकरच २१०० रुपये मिळणार असल्याचे आश्वासन महाराष्ट्र सरकारने दिले आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना आतापर्यंत ७ हप्ते देण्यात आले आहेत. (Ladki Bahin Yojana)

लाडकी बहीण योजनेत महिलांना जुलै महिन्यापासून पैसे येण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे आतापर्यंत महिलांना १०५०० रुपये मिळाले आहेत. एकूण ७ हप्ते देण्यात आले आहेत. १०५०० रुपये महिलांच्या अकाउंटला जमा झाले आहेत.

लाडकी बहीण योजनेत महिलांनी ज्या महिन्यापासून फॉर्म भरलेत त्यांना त्या महिन्यापासून पैसे मिळाले आहेत. ज्या महिलांनी जुलै महिन्यात अर्ज केलेत त्यांना १०५०० रुपये दिलेत. तर ज्या महिलांना ऑगस्ट सप्टेंबरनंतर अर्ज भरलेत त्यांना एकूण ९००० रुपये देण्यात आले आहेत. ऑक्टोबर महिन्यात अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. ऑक्टोबर महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना ४ महिन्यांचे पैसे देण्यात आले आहेत. या महिलांना ६००० रुपये दिले आहेत. (Ladki Bahin Yojana Update)

लाडकी बहीण योजनेत महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता दिला आहे. २६ जानेवारी म्हणजे उद्यापर्यंत सर्व महिलांना पैसे दिले जातील. या योजनेत १४ जानेवारीपर्यंत म्हणजेच मकरसंक्रांतीला पैसे दिले जातील. परंतु हे पैसे आता उद्यापर्यंत दिले जातील. लाडकी बहीण योजनेत तुम्हाला पैसे आलेत की नाही हे तुम्ही घरबसल्या चेक करु शकतात. तुम्ही मोबाईल बँकिंग अॅपवर जाऊन अकाउंटमध्ये किती पैसे आलेत ते पाहू शकतात. त्याचसोबत तुम्हाला पैसे डिपॉझिट झाल्यावर मेसेज येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 'या' महिन्यापासून पगारात होणार वाढ, सरकारचा मोठा निर्णय नेमका काय? वाचा...

Aadesh Bandekar Home Minister : पैठणीचा खेळ घेऊन लाडके भाऊजी पुन्हा येणार घरी, आदेश बांदेकरांचा 'होम मिनिस्टर' कधीपासून होणार सुरू?

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवला जाणार

Digital Pyament Alert : डिजिटल पेमेंट करण्यापूर्वी १० महत्त्वाच्या गोष्टी डोक्यात ठेवा, नाहीतर...

खासदार आष्टीकरांच्या खास माणसाचा सुषमा अंधारेंना फोन; कॉलवर नेमकं काय बोलणं झालं? VIDEO

SCROLL FOR NEXT