Ladki Bahin Yojana Saam tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: ४ लाख लाडक्या बहिणींनी दिले खोटे पत्ते; अंगणवाडी सेविका गेल्यावर घरेच नव्हती, धक्कादायक माहिती उघड

Majhi Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाखो महिलांनी सरकारचे पैसे लाटले आहे. महिलांनी अर्ज करताना जे पत्ते दिले ते खोटे होते. त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकांनी भेट दिली तेव्हा महिला सापडल्याच नाहीत.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती

४ लाखांपेक्षा जास्त महिलांनी दिले चुकीचे पत्ते

अंगणवाडी सेविका घरी गेल्यावर महिला सापडल्याच नाहीत

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक बोगस महिलांनी सरकारचे पैसे लाटले आहेत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिलांनी निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे. आतापर्यंत या योजनेतून २६ लाख ३४ हजार महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. या महिलांची अंगणवाडी सेविकांद्वारे पडताळणी सुरु आहे. दरम्यान, या योजनेत अनेक महिलांनी बोगस पत्ते दिले आहेत.

४ लाख महिलांनी दिले खोटे पत्ते

अनेक लाडक्या बहि‍णींनी आपले खोटे पत्ते दिले आहे. जेव्हा अंगणवाडी सेविका पडताळणीसाठी महिलांच्या घरी गेल्या तेव्हा त्या ठिकाणी कोणीच नव्हते. त्या पत्त्यावर कोणतेही घर नव्हते. त्यामुळे अनेक महिलांनी तर आपल्या घराचाच पत्ता खोटा दिला आहे. राज्यातील जवळपास ४ लाखांपेक्षा जास्त महिला या त्यांनी दिलेल्या पत्त्यावर सापडल्याच नाहीत. त्यामुळे या महिलांनी चुकीची माहिती देऊन फसवणूक केली आहे. या महिलांचे अर्ज आता बद करण्यात आले आहे.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत ४ लाख महिलांनी चुकीचे पत्ते दिले आहे. तर सोलापूर जिल्ह्यातील साडेदहा हजार महिलांनी चुकीचे पत्ते दिले आहेत. या ठिकाणी अंगणवाडी सेविकांनी भेट दिली तेव्हा त्या ठिकाणी महिला नव्हत्याच.

लाडकीसाठी महत्त्वाचा निर्णय

आता राज्यशासनाने लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लाडकी बहीण योजनेत आता जर एकाच घरातील महिलांचे वेगवेगळे रेशन कार्ड असेल तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. एका रेशन कार्डवर फक्त दोनच महिला लाभ घेऊ शकत होत्या. आता जर तुमचे रेशन कार्ड वेगळे असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samruddhi Kelkar: केसात गजरा अन् हिरवी साडी, समृद्धी केळकरच्या मेहंदीचे फोटो पाहिलेत का?

No Handshake मुळे भारतावर कारवाई होणार? वाचा ICC चा नियम काय सांगतो

Maharashtra Live News Update: मीरा भाईंदरसह वसई-विरार शहरात पावसाची रिपरिप

Nikhil Bane : फायनली ती माझ्या आयुष्यात आली; हास्यजत्रा फेम अभिनेत्याची पोस्ट व्हायरल

Majalgaon Rain : माजलगावमध्ये ढगफुटी; गंगामसला येथील मोरेश्वर मंदिर पाण्याखाली, गावांमध्ये पाण्याचा वेढा

SCROLL FOR NEXT