Ladki Bahin Yojana meta ai
बिझनेस

Ladki Bahin Yojana : ८ दिवसांत नोव्हेंबर संपणार, लाडक्या बहिणीला ऑक्टोबरचा १५०० चा हप्ता कधी मिळणार?

Ladki Bahin Yojana October Installment Date : लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता अजून जमा झालेला नाही.

Sakshi Sunil Jadhav

Ladki Bahin Yojana Installment Date : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नोव्हेंबर महिना संपायला आता फक्त ८ दिवस शिल्लक राहिले आहेत. तरी ऑक्टोबर महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना ऑक्टोबरच्या हप्तासाठी काही दिवस आणखी वाट पाहावी लागणार आहे. (Majhi ladki bahin yojana october installment date 2026)

ऐन लग्नसराईच्या काळात महिलांना आर्थिक मदतीची अपेक्षा असताना हप्ताबाबत कोणतीही अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. त्यामुळे आता ऑक्टोबरचा (Ladki bahin october installment date 2026 marathi) हप्ता कधी मिळणार आणि नोव्हेंबरचे पैसेही एकत्र जमा होणार का? असे प्रश्न उपस्थित होतायेत.

८ दिवस शिल्लक, तरी ऑक्टोबरचा हप्ता खात्यात नाही...

लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. पण ऑक्टोबर महिन्याचे पैसे अजून जमा झालेले नाहीत. नोव्हेंबरचेही २२ दिवस उलटून गेलेत. त्यामुळे लाभार्थी महिलांचं लक्ष आता सरकारच्या पुढच्या निर्णयाकडे लागलं आहे.

महत्त्वाचं म्हणजे, नोव्हेंबर महिना संपण्यासाठी आता फक्त ८ दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत ऑक्टोबरचा हप्ता या आठवड्यात जमा होणार का, याबाबत महिलांमध्ये उत्सुकता आहे.

ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे ३,००० रुपये एकत्र मिळणार?

सध्या महिलांमध्ये सर्वात जास्त चर्चा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या हप्त्याची सुरू आहे. ऑक्टोबरचे १५०० रुपये आणि नोव्हेंबरचे १५०० रुपये असे मिळून एकूण ३००० रुपये एकत्र मिळतील का, असा प्रश्न लाभार्थी महिलांना पडला आहे.

पण दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र देण्याबद्दल सरकारकडून सरकारकडून अजून कोणतीही अधिकृत घोषणा किंवा आदेश जारी करण्यात आलेला नाही. त्यामुळे ३००० रुपये एकत्र मिळणार असल्याच्या चर्चांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

हप्ता रखडण्यामागे नेमकं कारण काय?

राज्यातल्या काही भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने सरकारने शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या योजनांच्या निधीचं नियोजन सुरू असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेचा हप्ता रखडल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. पण हप्ता उशिरा मिळण्यामागे हेच कारण असल्याचं सरकारने अधिकृतपणे स्पष्ट केलेलं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:सार्वजनिक उपक्रम समितीचा पुणे-सातारा जिल्ह्यांचा दौरा; विकासकामांसह पाणी आणि वाहतूक प्रश्नांचा आढावा

Microwave Placement Vastu: किचनमध्ये फ्रीजच्या जवळ मायक्रोवेव ठेवावा का? जाणून घ्या वास्तू शास्त्रानुसार दोघांमध्ये किती अंतर असलं पाहिजे?

KBC मध्ये राज्याच्या न्यायव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह! अमिताभ बच्चन आणि सोनी टीव्हीला थेट नोटीस, नेमकं प्रकरण काय?

शक्तीपीठ महामार्ग: मॅपिंगसाठी आलेल्या प्रशासनाला शेतकऱ्यांनी रोखलं; २०० पोलिसांचा फौजफाटा तैनात, अनेक आंदोलक ताब्यात

Water Test: सरकार ॲक्शन मोडमध्ये, सर्व ब्रँडच्या बाटलीबंद पाण्याची चाचणी होणार; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT