Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींच्या खात्यात ₹१५०० जमा होण्यास सुरुवात, तुम्हाला आले की नाही? अशा पद्धतीने करा चेक

Ladki Bahin Yojana October 1500 Rupees Installment From Today: लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आजपासून ऑक्टोबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी

लाडकी बहीण योजनेत ऑक्टोबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात

तुम्हाला पैसे आले की नाही, अशा पद्धतीने करा चेक

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आजपासून ऑक्टोबरचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. दरम्यान, ऑक्टोबरचा हप्ता जमा होण्यास उशीर झाला आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पैसे जमा करण्यात आले आहेत.दरम्यान, लाडकी बहीण योजनेत तुम्हाला पैसे आले की नाही हे तुम्ही ऑनलाइन पद्धतीने चेक करु शकतात.

लाडक्या बहि‍णींना पैसे आले की नाही? (Ladki Bahin Yojana Installment Recieve or Not)

लाडकी बहीण योजनेत महिलांना पैसे आले आहेत की नाही हे तुम्ही ऑनलाइन पद्धतीने चेक करु शकतात. तुम्हाला ऑनलाइन बँक अॅपवर जाऊन पैसे आलेत की नाही हे चेक करायचे आहे. यासाठी बँकेच्या अधिकृत अॅपवर जाऊन तुम्हाला ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये पैसे जमा झाले की नाही हे कळणार आहे.

याचसोबत तुम्ही ऑफलाइन पद्धतीने बँकेत जाऊनदेखील पैसे जमा झाले की नाही हे चेक करु शकतात. तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने बँकेत जायचे आहे आणि पासबुकवर एन्ट्री करुन घ्यायची आहे. त्यावर तुम्हाला पैसे आले की नाही हे कळणार आहे. याचसोबत तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाल्यावर बँक आणि लिंक असलेल्या फोन नंबरवर मेसेज येणार आहे.

आदिती तटकरेंनी केली घोषणा (Aditi Tatkare Annoucement)

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी याबाबत घोषणा केली आहे. त्यांनी काल पोस्ट करत माहिती दिली आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना येत्या २ ते ३ दिवसांत पैसे जमा केले जाणार आहेत. त्यामुळे सर्व लाभार्थी महिलांना लवकरच पैसे दिले जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाशिकमध्ये तब्बल 3 लाख दुबार मतदार; बोगस मतदारविरोधात शिंदेसेनाच मैदानात

Election Commission: नगर परिषद, नगर पंचायती निवडणूक; उमेदवारांना किती पैसे खर्च करता येतील?

Fact Check : मुंबईतील सोसायट्यांमध्ये फिरतंय भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Junnar leopard Attack : बिबट- माणसांचा संघर्ष उफाळला, पुण्यात बिबट्यानं घेतला 60 जणांचा बळी; नागरिक म्हणतात गोळ्याच घाला

Gangster reels : रिलस्टार बनतायेत गँगस्टर? दहशतीच्या रिल्स बनवाल जेलमध्ये जाल, VIDEO

SCROLL FOR NEXT