Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: आचारसंहितेच्या काळात लाडक्या बहिणींना ₹१५०० मिळणार का? नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर

Ladki Bahin Yojana November Installment Update: लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. याचसोबत निवडणुकीच्या काळात महिलांना पैसे मिळणार की नाही असा संभ्रम निर्माण झाला आहे.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींच्या कामाची बातमी

आचारसंहितेच्या काळात महिलांना पैसे मिळणार का?

नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट

लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबरच्या हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहत आहे. नोव्हेंबर महिन्याचे पहिले २० दिवस उलटून गेले आहे तरीही अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यातच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या आहेत. यामुळे आचारसंहिता लागू झाली आहे. या कालावधीत महिलांना पैसे मिळणार की नाही अशा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत महिलांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.

आचारसंहितेच्या काळात लाडक्या बहि‍णींना पैसे मिळणार का? (WIll Ladki Bahin Yojana Beneficiaries Get Money in Code of Condut)

आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेच्या काळात कोणत्याही योजनेअंतर्गत पैसे दिले जात नाही. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कालावधीतही महिलांना पैसे देणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे महिलांना पैसे कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

निवडणुकीआधी पैसे मिळण्याची शक्यता

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. नगपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका २ आणि ३ डिसेंबर रोजी होणार आहेत.या निवडणुका होण्याआधी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात, असं सांगण्यात येत आहे.त्यामुळे महिलांना महिनाअखेरीस खुशखबर मिळू शकते. लवकरच याबाबत घोषणा केली जाईल.

लाडकी बहीण योजनेबाबत दोन महत्त्वाचे निर्णय (Ladki Bahin Yojana Impoartant Update)

लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने निवडणुकीपूर्वी दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. एक म्हणजे लाडक्या बहिणींना केवायसीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. दुसरा निर्णय म्हणजे महिलांना केवायसी करताना येणारी अडचण दूर करण्यासाठी वेबसाइटमध्ये बदल करण्यात आला आहे. यामुळे ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाही त्यांनाही केवायसी करता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'पैसे देऊन आमचे नेते फोडले', भाजप नेत्यावर शिंदेंचा आरोप; अमित शहांसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: नीतीश कुमारांसह २५ मंत्री घेणार शपथ

Dink Ladoo Benefits: हिवाळ्यात डिंक लाडू खाल्ल्याने काय फायदा होतो?

Pune : ससून रुग्णालयातून भाजप नेत्याचे सासरे गायब, २ महिन्यांपासून शोध सुरू; नेमकं काय घडलं?

Maharashtra Politics: भाजपनंतर राष्ट्रवादीकडून आरोपीला उमेदवारी, तुरूंगातून लढवणार नगराध्यपदाची निवडणूक

SCROLL FOR NEXT