Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: नोव्हेंबरचा हप्ता आला, आता लाडक्या बहिणींना डिसेंबर-जानेवारीचे ₹३००० एकत्र येणार?वाचा सविस्तर

Ladki Bahin Yojana December-January Installment: लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबरचा हप्ता जमा झाला आहे. आता डिसेंबर आणि जानेवारीचे ३००० रुपये एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती

नोव्हेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात

आता डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र येणार?

लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबरचा हप्ता जमा झाला आहे. त्यानंतर आता महिला डिसेंबरच्या हप्त्याची वाट पाहत आहे. डिसेंबर महिना संपून गेला तरीही अजून पैसे न आल्याने महिलांच्या मनात अनेक प्रश्न विचारला जात आहे. नोव्हेंबर- डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, फक्त नोव्हेंबरचे १५०० रुपये जमा झाले. त्यामुळे महिलांना हिरमोड झाला आहे.दरम्यान आता डिसेंबर-जानेवारीचा हप्ता एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

डिसेंबर-जानेवारीचा हप्ता एकत्र येणार? (Ladki Bahin Yojana December-January Installment May Come Together)

लाडकी बहीण योजनेत डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे कधी येणार, दोन महिन्याचे पैसे एकत्र येणार का असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, हा हप्ता १४ जानेवारी म्हणजेच मकरसंक्रांतीपूर्वी जमा केली जाण्याची शक्यता आहे.

या दिवशी खात्यात जमा होऊ शकतात ३००० रुपये (Ladki Bahin Yojana 3000 Rupees come on these Date)

मकरसंक्रांतीपूर्वी महिलांच्या खात्यात फक्त डिसेंबरचे पैसे जमा होऊ शकतात किंवा दोन महिन्याचे ३००० रुपये मिळू शकतात. याचसोबत जर डिसेंबर-जानेवारीचा हप्ता एकत्र दिला नाही तर एका महिन्याचा हप्ता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याआधी मिळू शकतो. दरम्यान, याबाबत लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल.

केवायसीची डेडलाइन संपली

लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे अनिवार्य आहे. केवायसी न केल्यास महिलांचा लाभ बंद होणार आहे. आता केवायसी करण्याचीही मुदत संपली आहे. त्यामुळे ज्या महिलांनी केवायसी केले नाही त्या महिलांना फटका बसणार आहे. त्यांना यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana Temperature: हिल स्टेशन झालं उष्ण हवेचं ठिकाण! तब्बल ६८ वर्षानंतर बुलढाण्यात ४३ डिग्री तापमानाची नोंद

Face Care: रिंकल्स आणि डाग कायमचे कमी करायचे आहेत? मग आठवड्यातून ३ वेळा लावा 'हा' फेसपॅक

Maharashtra News Live Update: सोनोशी–पिंपरखेड शिवारात अस्वलाचा धुमाकूळ; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

बँक कर्मचाऱ्यांची चांदी! पगारात होणार भरघोस वाढ; अर्थ मंत्रालयाने नेमका काय आदेश दिला?वाचा सविस्तर

भाजपमध्ये गेलेले ७ खासदार पुन्हा आम आदमी पार्टीत परतणार? काय आहे राइट टू रिकॉल?

SCROLL FOR NEXT