Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: उरले शेवटचे ६ दिवस!लाडक्या बहि‍णींना नोव्हेंबरचे ₹१५०० कधी मिळणार? वाचा सविस्तर

Ladki Bahin Yojana November Installment update: लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहेत. दरम्यान, निवडणूकीपूर्वी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार?

नोव्हेंबर महिना संपायला उरले फक्त ६ दिवस

निवडणूकीआधी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता

लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न महिला विचारत आहेत. नोव्हेंबर महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. तरीही अजून नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. लवकरच याबाबत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

निवडणूकीपूर्वी मिळणार लाडकीचा हप्ता (Ladki Bahin Yojana November Installment)

लाडकी बहीण योजनेचा हप्ता नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणूकीपूर्वी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २-३ डिसेंबर रोजी निवडणुका होणार आहेत. त्याआधीच महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा केले जाणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. लवकरच घोषणा केली जाईल.

लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबरचा हप्ता कदाचित लांबणीवरदेखील जाऊ शकतो. डिसेंबर महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. त्यामुळे अजूनही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अधिकृत घोषणा झाल्यानंतरच महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील.

लाडकी बहीण योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय (Ladki Bahin Yojana eKYC)

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आता महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाहीये. यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे सर्व लाभार्थी महिलांनी मुदतीपूर्वी केवायसी करायचे आहे.

ईकेवायसी पडताळणीतून अनेक महिलांचे अर्ज बाद होणार

लाडकी बहीण योजनेत ई केवायसी प्रक्रिया केली जाणार आहे. या ई केवायसी प्रोसेसमधून महिलांच्या माहितीची पडताळणी केली जाणार आहे. यातून ज्या महिला निकषात बसत नाही त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत. यामध्ये तुमच्या कुटुंबाचे उत्पन्न, एकापेक्षा जास्त महिला योजनेचा लाभ घेत तर नाही ना याची माहिती मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT