Ladki Bahin Yojana August Installment meta ai
बिझनेस

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा जमा होणार अडकलेले पैसे? व्हायरल मेसेजचं सत्य आले समोर

Ladki Bahin Yojana August Installment : लाडकी बहीण योजनेच्या रखडलेल्या हप्त्यांसाठी पुन्हा अर्ज करण्याचा मेसेज व्हायरल आहे. मात्र नवीन नोंदणी व ई-केवायसीबाबत दावा अधिकृत लिंकपासून सावध राहावे.

Sakshi Sunil Jadhav

लाडक्या बहि‍णींच्या खात्यात ऑगस्ट महिन्याचा हप्ता यायला सुरूवात झाली आहे. पण या योजनेसंदर्भात सध्या सोशल मीडियावर सध्या एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये नवीन अर्ज प्रोसेस सुरू झाली असून, रखडलेले हप्ते मिळवण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करून पुन्हा अर्ज करण्याचं आवाहन केलं जात आहे. मात्र, या दाव्याबाबत शासनाकडून महत्त्वाचा खुलासा करण्यात आला आहे.

व्हायरल मेसेजमध्ये ई-केवायसी अपूर्ण राहिलेल्या किंवा हप्ते बंद झालेल्या महिलांनी पुन्हा अर्ज करावा, असं सांगितलं जातं. अर्जासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, बँक खात्याची माहिती आणि फोटो यांसारखी वैयक्तिक कागदपत्रे मागितली जात असल्याचा दावा आहे. मात्र, अशा अनधिकृत लिंकवर माहिती भरल्याने वैयक्तिक आणि बँकिंग माहितीचा गैरवापर होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

नवीन नोंदणी आणि ई-केवायसीबाबत काय?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नवीन नोंदणी प्रोसेस सध्या बंद असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच ई-केवायसी पुन्हा सुरू झाल्याचा सोशल मीडियावरील दावा अधिकृत नसल्याचं स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे लाभार्थींनी अनोळखी वेबसाइट किंवा लिंकवर क्लिक करून कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नये.

ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी

दरम्यान, पात्र लाभार्थी महिलांना ऑगस्ट २०२६ चा आर्थिक लाभ देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या ३३९ कोटी १४ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. २०२६ - २७ या आर्थिक वर्षात अनुसूचित जाती घटकासाठी योजनेकरिता ३ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यातून ऑगस्ट महिन्याच्या लाभासाठी ३३९ कोटी १४ लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

हा निधी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडून महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. निधीचे वितरण करताना लाभार्थींची छाननी करून फक्त पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळेल, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

व्हायरल लिंकपासून सावध राहा

लिंकवर क्लिक करा आणि रखडलेला हप्ता मिळवा अशा संदेशांवर थेट विश्वास ठेवू नये. नवीन नोंदणी, ई-केवायसी, हप्ता किंवा निधी वितरणासंदर्भातली माहिती फक्त महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत यंत्रणांकडूनच तपासावी. लाभार्थी महिलांनी कोणत्याही अनधिकृत वेबसाइटवर आधार किंवा बँक खात्याची माहिती देऊ नये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आता 28 नव्हे तर 30 दिवसांसाठी रिचार्ज; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: मोठी बातमी! केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात शिवाजी पार्कवर एल्गार; CJP चे पोलिसांना थेट पत्र

Nitin Gadkari : पेट्रोलचे टेन्शन विसरा! आता २५ रुपये लिटरमध्ये धावणार कार; गडकरींचा दावा पाहून बसेल धक्का

दुष्काळाच्या संकटात बळीराजासाठी देवस्थान धावून आलं; थेट १ कोटी ११ लाखांची मदत

Rice vs Chapati : भात की चपाती, वजन कमी करण्यासाठी काय बेस्ट? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT