Dal Makhani Recipe: हॉटेलमध्ये खाण्याची गरज नाही! अशी बनवा घरच्या घरी रेस्टॉरंटसारखी दाल माखनी

Sakshi Sunil Jadhav

दाल माखनी रेसिपी

दाल माखनी ही बनवायला सर्वात सोपी रेसिपी आहे. फक्त तुम्ही त्याचं योग्य प्रमाण जाणून घेतलं पाहिजे.

Dal Makhani Recipe

साहित्य

1 कप उडीद डाळ, दीड कप राजमा, 2 कांदे, 2 टोमॅटो, 1 चमचा आलं-लसूण पेस्ट, बटर, क्रीम, तेल, मीठ, तिखट आणि गरम मसाला घ्या.

Restaurant Style Dal Makhani

डाळ आणि राजमा भिजवा

उडीद डाळ आणि राजमा स्वच्छ धुवून किमान 8 तास किंवा रात्रभर पाण्यात भिजत ठेवा, त्यामुळे ते लवकर शिजतात.

Restaurant Style Dal Makhani

कुकरमध्ये शिजवा

भिजलेली डाळ-राजमा कुकरमध्ये घेऊन पाणी आणि थोडे मीठ घाला आणि 5 ते 6 शिट्ट्या होईपर्यंत चांगले शिजवून घ्या.

Restaurant Style Dal Makhani

डाळ मॅश करा

कुकरचे झाकण उघडल्यानंतर डाळ-राजमा हलकेच मॅश करा. कढईत तेल आणि थोडे बटर गरम करून बारीक चिरलेला कांदा परता, त्यानंतर आलं-लसूण पेस्ट आणि टोमॅटो घालून मिश्रण चांगले शिजवा.

Restaurant Style Dal Makhani

मसाले घाला

मसाला शिजल्यानंतर त्यात लाल तिखट, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करा.

Restaurant Style Dal Makhani

डाळ मसाल्यात मिसळा

आता शिजवलेली डाळ आणि राजमा मसाल्यात घालून आवश्यकतेनुसार पाणी मिसळा आणि मंद आचेवर चांगले उकळू द्या.

Creamy Dal Makhani

गरमागरम सर्व्ह करा

दाल माखनीवर थोडे बटर आणि क्रीम घालून नान, रोटी, पराठा किंवा जीरा राईससोबत गरमागरम सर्व्ह करा.

Punjabi Dal Makhani Recipe

NEXT : LPG ग्राहकांसाठी शेवटची संधी! ३० सप्टेंबरनंतर बंद होणार हा मोठा फायदा, लगेच करा हे काम

LPG e-KYC | meta ai
येथे क्लिक करा