Sakshi Sunil Jadhav
LPG ग्राहकांनी ई-केवायसी पूर्ण केली नाहीतर १ ऑक्टोबर २०२६ पासून त्यांच्या सबसिडीच्या लाभावर परिणाम होऊ शकतो.
गॅस कंपन्यांनी ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी ग्राहकांना ३० सप्टेंबर २०२६ पर्यंतची मुदत दिली आहे.
इंडियन ऑइल, HPCL आणि BPCLच्या एकूण ४९.८९ लाखांपेक्षा जास्त ग्राहकांनी अद्याप ईकेवायसी पूर्ण केलेली नाही.
आतापर्यंत १ कोटी २० लाख ३५ हजार एलपीजी ग्राहकांनी ईकेवायसी पूर्म केल्याची माहिती देण्यात आली आहे.
IOCLच्या तब्बल २७.५७ लाख ग्राहकांनी अजून e-KYC प्रोसेस पूर्ण केले नसल्याचं आकडेवारीत नमूद आहे.
हिंदुस्तान पेट्रोलियमच्या सुमारे ६.४० लाख ग्राहकांची e-KYC प्रक्रिया अजून बाकी आहे.
भारत पेट्रोलियमच्या 15.92 लाख ग्राहकांनी अद्याप e-KYC पूर्ण केलेली नसल्याची माहिती समोर आली आहे.
ग्राहक संबंधित गॅस कंपनीच्या मोबाइल अॅपद्वारे किंवा अधिकृत गॅस एजन्सीशी संपर्क साधून e-KYC प्रक्रियेबाबत माहिती घेऊ शकतात.