Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूप जास्त प्रसिद्ध झाली आहे. महाराष्ट्रातील कोट्यवधी महिलांनी या योजनेत अर्ज केला आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात दर महिन्याला १५०० रुपये जमा केले जातात. आतापर्यंत जुलै ते नोव्हेंबर महिन्याचे एकूण ७५०० रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. त्यानंतर आता पुढचा हप्ता महिलांच्या खात्यात कधी येणार, याबाबत महिलांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत.

लाडकी बहीण योजनेत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे ३००० रुपये एकत्रितपणे देण्यात आले होते. त्यानंतर सप्टेंबर महिन्याचे पैसे दिले. यानंतर आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे अॅडव्हान्समध्ये देण्यात आले आहे. १० ऑक्टोबरला हे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले. दरम्यान, आता पुढचा हप्ता महिलांच्या अकाउंटला कधी जमा होणार याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

आता लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता हा डिसेंबर महिन्यात दिला जाण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता डिसेंबर महिन्यात देण्याचे कारण म्हणजे पुढचा महिनाभर आचारसंहिता लागू आहे. आचारसंहिता लागू झाल्याने कोणत्याही योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा केले जाणार नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता महिलांना पुढील हप्त्यासाठी दीड महिना वाट पाहावी लागणार आहे. (Ladki Bahin Yojana Next Installment)

या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी लागू करण्यात आल्या आहेत. जर तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक असेल तरच तुमच्या अकाउंटला पैसे जमा केले जाणार आहे. त्याचसोबत योजनेचा लाभ घेणारी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी.त्याचसोबत महिलेच्या कुटुंबातील कोणीही सरकारी नोकरी करत नसावे, तसेच कुटुंबातील सदस्य इन्कम टॅक्स भरत नसावा. याचसोबत ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असेल त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. (Ladki Bahin Yojana Eligibility)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

Poha Chivda: दिवाळीसाठी घरी खमंग अन् कुरकुरीत बनवा पोह्यांचा चिवडा

Mithila Palkar: वेब क्विन करतेय इटलीत भटकंती; पाहा फोटो

SCROLL FOR NEXT