Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींचं टेन्शन वाढणार! अर्जाची पडताळणी होणार सुरु?'या' महिलांना मिळणार नाहीत पैसे

Ladki Bahin Yojana Verification: लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता अर्जांची पडताळणी सुरु केली जाणार आहे.

Siddhi Hande

महाराष्ट्रातील महायुती सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना १५०० रुपये दिले जातात. विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला यश मिळाल्यानंतर २१०० रुपये दिले जाण्याचे आश्वासन दिले गेले होते. या योजनेअंतर्गत आता अर्जांची पडताळणी केली जाणार आहे.

महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले. या या योजनेअंतर्गत सरकार आता महिलांच्या अर्जांची तपासणी सुरु करण्याच्या तयारीत आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत आतापर्यंत २ कोटींपेक्षा जास्त महिलांनी अर्ज भरले आहेत.त्यामुळे आता सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता अर्जाची तपासणी केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांपर्यंतच मदत करण्यासाठी भर देण्यात येणार आहे. या पडताळणीचा उद्देश प्रक्रियेत केवळ पात्र महिलांना लाभ मिळावा असा आहे. (Ladki Bahin Yojana)

या योजनेअंतर्गत आता लाभार्थी महिलांना पडताळणी प्रक्रियेतून जावं लागणार आहे. त्यामुळे ज्या महिलांनी खोटे दावे केले आहेत, त्या महिलांना आता लाभ मिळणार नाही. या योजनेत कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे.

लाडकी बहीण योजनेचे निकष (Ladki Bahin Yojana Verification Process)

ज्या महिलांच्या कुटुंब २.५ लाखांपेक्षा कमी आहेत. त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. याचा पुरावा त्यांना सादर करावा लागेल.

आयकर प्रमाणपत्र सादर करावे लागेल. त्यातून लाभार्थ्यांची वैधता चेक केली आहे.

सेवानिवृत्ती पेन्शन आणि वाहन- अर्जदारांना निवृत्तीवेतन प्राप्त करणाऱ्या किंवा चारचाकी वाहन आहे की नाही या छाननीला सामोरे जावे लागणार आहे.

कुटुंबातील लाभार्थ्यांची मर्यादा- एका कुटुंबातीत फक्त २ महिलांना लाभ मिळणार आहे. त्यामुळे त्या अर्जाची पडताळणी केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT