Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? मोठी अपडेट आली समोर

Sudhir Mungantiwar News : महायुती सरकारची बहुचर्चित लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवून देण्याची ग्वाही महायुतीच्या संकल्प पत्रात देण्यात आली आहे. त्यानंतर आता ही रक्कम कधी वाढवून मिळणार याबद्दल मोठी माहिती भाजपच्या नेत्याकडून देण्यात आली आहे.
Ladki Bahin Yojna
Ladki Bahin YojnaSaamTv
Published On

महायुतीकडून राज्यातील महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या बहुचर्चित 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेसंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढ करण्यात येईल अशी हामी महायुतीच्या सरकारने विधानसभा निवडणुकीच्या आपल्या जाहीरनाम्यात दिली होती. त्यानंतर आता आज भाजपच्या मोठ्या नेत्याकडून याबाबत माहिती देण्यात आली असून ही वाढ नेमकी कधी होईल याबद्दल खुलासा केला आहे.

भाजपचे नेते तथा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लाडक्या बहिणींना देण्यात येणाऱ्या रक्कमेत महायुतीकडून निश्चित वाढ होणार असून ही वाढ कधी होईल याबद्दल माहिती देण्यात आली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी त्यांनी याबद्दल भाष्य केलं आहे. त्यामुळे आता महायुतीची सत्ता स्थापन झाल्यावर लवकरच राज्याच्या लाडक्या बहिणींसाठी गोड बातमी देण्यात येईल अशी शक्यता आहे.

राज्यातील 21 वर्षे ते 65 वर्षांपर्यंत वयोमर्यादा असलेल्या महिलांना महायुती सरकारच्या लाडकी बहीण या योजनेतून प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. आत्तापर्यंत सुमारे दोन कोटी महिलांना या योजनेचा लाभ झाला असल्याचा दावा महायुतीच्या मंत्र्यांकडून करण्यात आलेला आहे. या रक्कमेत आता लवकरच वाढ केली जाणार असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हंटलं आहे.

गरज पडल्यास मी स्वत: सरकारकडे मागणी करेन

एका मुलाखतीत सुधीर मुनगंटीवार यांना प्रश्न विचारण्यात आला, त्यानंतर त्यांनी याबाबत उत्तर देताना म्हंटलं की, लाडकी बहीण योजनेचे मानधन वाढवण्याचे वचन आमच्या संकल्प पत्रात आम्ही आमच्या बहिणींना दिले आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे मानधन निश्चितपणे वाढेल. राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेतला जाईल.

Ladki Bahin Yojna
Maharashtra Politics : महायुती सरकारचा शपथविधी कसा होणार, कोण कोण उपस्थित राहणार? वाचा सविस्तर

आगामी अर्थसंकल्पात सरकार या योजनेच्या रकमेत वाढ करू शकते. ही योजना रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सुरु झाली होती, त्यामुळे रक्षाबंधनला देखील याची रक्कम वाढून दिली जाऊ शकते. अद्याप निश्चितपणे त्यासंदर्भात सांगता येणार नाही. मात्र तशी गरज वाटली तर मी स्वतः यासंदर्भात सरकारकडे मागणी करेन, असं मुनगंटीवार यांनी म्हंटलं आहे.

Ladki Bahin Yojna
Gold Price Today : सोनं घ्या सोनं! आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याचा भाव घसरला; आजचा भाव किती पाहा

योजनेचे मानधन 3 हजार करा

दरम्यान, या योजनेची रक्कम वाढवून 3 हजार रुपये करण्यात यावी अशी मागणी महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. ठाकरे गटाचे नेते आंबादास दानवे यांनी लाडकी बहीण योजनेची रक्कम आता वाढवून 3 हजार रुपये केली पाहिजे अशी मागणी केली आहे.

Ladki Bahin Yojna
Subhadra Yojana: या राज्यातील महिलांना सरकार देते १०,००० रुपये; सुभद्रा योजना नक्की आहे तरी काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com