Ladki Bahin Yojana These Women Will Get 3000 Rupees Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana : या लाडक्या बहिणींच्या खात्यात तीन हजार येणार, कारण आलं समोर

Ladki Bahin Yojana These Women Will Get 3000 Rupees : लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता लवकरच मिळणार आहे. काही बहिणींच्या खात्यात या महिन्यात ३,००० रुपये येणार असल्याचे म्हटले जात आहे.

Yash Shirke

लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे महिलांचे लक्ष लागले आहे. मे महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. पुढच्या आठवड्यात लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता येऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, काही महिलांच्या खात्यात १,५०० च्या ऐवजी ३,००० रुपये येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

लाडक्या बहिणींना मे महिन्यातील हप्ता लवकरच मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. काही बहिणींच्या खात्यात ३,००० रुपये पाठवले जाणार आहे. मागच्या महिन्यात या महिलांच्या खात्यात हप्त्याचे पैसे जमा झाले नव्हते. तेव्हा मागच्या आणि सुरु असलेल्या महिन्याचे असे एकत्रित ३,००० रुपये महिलांच्या बँकेच्या खात्यात जमा होतील. इतर महिलांच्या खात्यात १,५०० रुपये जमा होतील.

ज्या महिलांच्या बँकेच्या खात्यात एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम जमा झालेली नाही. अशा सर्व बहिणींच्या खात्यात एकाच वेळी दोन हप्त्यांची रक्कम सरकारद्वारे पाठवली जाणार आहे. अशा प्रकारे, या बहिणीच्या खात्यात तीन हजार रुपये पाठवले जातील. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हप्तेचे पैसे खात्यात जमा होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्यातील हप्त्याचे पैसे २५ मे पासून पाठवण्यास सुरुवात होईल. त्यानंतर ३१ मे पर्यंत योजनेसाठी पात्र असणाऱ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होती. महाराष्ट्र राज्यातील एकूण २.५२ कोटी महिला लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्यातील हप्त्याची वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

SCROLL FOR NEXT