Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची बातमी! १ मार्चला मोठा निर्णय होणार; २१०० रुपये देणार

Majhi Ladki Bahin Yojana 2100 Rupees Installment: लाडकी बहीण योजनेत महिलांना सध्या १५०० रुपये दिले जात आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना २१०० रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत आली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची तपासणी सुरु होणार आहे. या योजनेत महिलांना सध्या दर महिन्याला १५०० रुपये दिले जात आहेत. या योजनेत २१०० रुपये देण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. लाडकी बहीण योजनेत आता २१०० रुपये लवकरच मिळण्याची शक्यता आहे.(Ladki Bahin Yojana)

महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेत महिलांना राज्याच्या अर्थसंकल्पानंतर २१०० रुपये दिले जाण्याची शक्यता आहे. याबाबत अनेक नेत्यांनी वक्तव्य केली आहेत. दरवर्षी राज्याचा अर्थसंकल्प १ मार्चला सादर करतात. दरम्यान, १ मार्चच्या अर्थसंकल्पात हा महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये देण्याचे आवाहन सरकारने केले होते. त्यानंतर आता महिला २१०० रुपयांच्या प्रतिक्षेत होत्या. अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळेआता सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष अर्थसंकल्पाकडे लागले आहे.

लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये कधी मिळणार? (When Will 2100 Rupees Recieve)

एकीकडे महायुतीच्या अनेक नेत्यांनी अर्थसंकल्पानंतर महिलांना २१०० रुपये देण्याची शक्यता वर्तवली आहे. तर दुसरीकडे महिला व बालविकास विभागाने अद्याप २१०० रुपयांबाबत कोणताही प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे केली नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्याची अंबलबजावणी होण्यासाठी किमान तीन-चार महिने तयारी करावी लागते. त्यामुळे मार्च महिन्यात तरी लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये मिळणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

५ लाख महिला अपात्र

लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत ५ लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. ज्या महिलांनी नियम डावलून योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांचे अर्ज आता बाद करण्यात आले आहेत. या ५ लाख महिलांमध्ये ६५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील महिलांचा समावेश आहे. तसेच अनेक महिला इतर अनेक योजनांचाही लाभ घेतला आहे. त्यांचेही अर्ज बाद करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime News : दिवसाढवळ्या गोळीबार, पुण्यातील पाटस हादरलं; दोन गटांतील वादानंतर तुफान हाणामारी

हृदयद्रावक! सर्पदंशाने ३ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; कुटुंबीयांनी सापच आणला रुग्णालयात

Chanakya Niti : चाणक्यांच्या या 6 सायलेन्स स्टॅटर्जी शत्रूला करतील कमजोर

Maharashtra News Live Update: अमरावती जिल्ह्यातील पेडी नदी पुलावर भीषण अपघात

Pimpari-Chinchwad: पिंपरी-चिंचवडकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी, १४ दिवसांसाठी जमावबंदी; काय सुरू अन् काय बंद?

SCROLL FOR NEXT