Ladki Bahin Yojana Saa m Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो eKYC केली तरी मिळणार नाहीत ₹ १५००;कारण काय? वाचा सविस्तर

Ladki Bahin Yojana KYC Update These Women will not get ₹1500: लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. दरम्यान, तुम्ही केवायसी करताना ही चूक केली असेल तर तुमचा लाभ कायमचा बंद होईल.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेच्या केवायसीबाबत मोठी अपडेट

लाडक्या बहिणींना केवायसी करणे अनिवार्य

केवायसी करताना ही चूक केली तर बंद होतील १५०० रुपये

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. जर केवायसी केले नाही तर तुम्हाला योजनेचा पुढचा हप्ता मिळणार नाही. दरम्यान तुम्ही केवायसी केली तरीही तुमचा लाभ बंद होण्याची शक्यता आहे.

या लाडक्या बहि‍णींचे पैसे बंद होणार (These Women Will Not Get 1500 Rupees Installment)

लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे पुढच्या १५ दिवसात महिलांना केवायसी करायचे आहे. जर केवायसी केले नाही तर योजनेचा लाभ कायमचा बंद होईल. याआधी ही तारीख १८ नोव्हेंबर होती.अजूनही लाखो महिलांचे केवायसी झाले नाही त्यामुळे ही मुदत वाढवून देण्यात आली आहे.

केवायसीतील ही चूक पडू शकते महागात (Ladki Bahin Yojana KYC Avoid These Mistakes)

लाडक्या बहि‍णींना केवायसी करतानाही विशेष काळजी घ्या.जर तुम्ही आधार कार्ड किंवा मोबाईल नंबर चुकीचा टाकला असेल तर ओटीपी दुसऱ्याच क्रमांकावर जाईल. त्यामुळे महिलांना अडचणी येऊ शकतात. याचसोबत ज्या महिलांचे पती आणि वडील हयात नाही त्या महिलांनी संबंधित कागदपत्रे ही महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडे जमा करायचे आहेत. जर तुम्ही कागदपत्र जमा केले नाही तर तुमची केवायसी पूर्ण होणार नाही. परिणामी तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही.

केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. केवायसी पडताळणीत अपात्र असूनही ज्या महिलांनी लाभ घेतला त्यांची नावे समोर येणार आहेत. त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashmika Mandanna: 'पदरावर देवी, हातावर मेंहदी...'; रश्मिका मंदान्नाच्या मेहंदी समारंभाचे सुंदर फोटो व्हायरल

Health Care : उन्हाळ्यात दही खाल्याने काय होते? जाणून घ्या

Nashik Tourism : हजारो वर्षांचा इतिहास दडलाय 'या' किल्ल्यात, नाशिकमध्ये घ्या ट्रेकिंगचा अनोखा अनुभव

Blocked arteries: हृदयाच्या धमन्या ब्लॉक झाल्यावर हातामध्ये दिसतात ही लक्षणं; शरीरातील बदल वेळीच ओळखा

Shocking: बंद कारमध्ये आढळले दोघांचे मृतदेह अन् दारू, दार उघडताच पोलिसही चक्रावले; परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT