Ladki Bahin Yojana saam tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: पुरुषांसारखीच लाडक्या बहि‍णींची नावे! KYC करणाऱ्या अंगणवाडी सेविकाही गोंधळल्या

Ladki Bahin Yojana Verification Update: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत आता अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन महिलांची पडताळणी करणार आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत अपडेट

पुरुषांसारखीच लाभार्थी महिलांची नावे

अंगणवाडी सेविकांना पडताळणी करण्यास अडचणी

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचाच हप्ता अनेक महिलांच्या खात्यात जमा झालेला नाहीये. केवायसीमध्ये काही अडचणी असल्याने महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. दरम्यान, आता या महिलांची प्रत्यक्ष पडताळणी सुरु झाली आहे. मात्र, या पडताळणीतदेखील खूप अडचणी येत आहेत.

पुरुषांसारखीच महिलांची नावे

अंगणवाडी सेविका महिलांची पडताळणी करत आहेत. यामध्ये महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी असायला हवे. याचसोबत कुटुंबातील कोणीही सरकारी नोकरदार नसायला हवेत. या निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळत आहे. दरम्यान, आता पुरुषांच्या नावासारखीच लाडक्या बहि‍णींची नावे आहेत. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना पडताळणीसाठी अडचणी येत आहेत.

अनेक महिलांची नावे रोशन, किरण, शशी, माही असे आहेत. त्यामुळे हे नक्की पुरुष आहेत की महिला असा प्रश्न पडला आहे. यामुळे आता अंगणवाडी सेविका महिलांच्या घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत. घरोघरी जाऊन नक्कीच महिलाच लाभ घेत आहेत का, हे चेक केले जाणार आहे.

मध्यंतरी अनेक पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला होता. जवळपास १४ हजार पुरुषांनी योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता काळजी म्हणून अशा नावांच्या महिलांची पडताळणी केली जाणार आहे.

केवायसीतील चूक सुधारण्यासाठी अजून एक संधी

लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसीमधील चूक सुधारण्यासाठी आता संधी दिली आहे. अनेक महिलांनी ३१ डिसेंबरआधी केवायसी केलेले नाहीत. तर अनेक महिलांनी प्रश्नांची चुकीची उत्तरे दिली आहेत. त्यामुळे आता महिलांच्या प्रत्यक्ष पडताळणीची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर सोपवली आहे. केवायसीतील दुरुस्ती करण्यासाठी मुदत दिली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

टीम इंडियाला मिळाला नवा कर्णधार! स्मृती मंधानाकडं महिला क्रिकेट संघाचं नेतृत्व

Pitru Paksha Tv - Mobile Shopping: पितृपक्षात नवीन टिव्ही, मोबाईल फोन खरेदी करावा की नाही?

Ind vs NZ T20 Series : भारतीय संघाची घोषणा; 'पब्लिक डीमांड' खेळाडूचं 4 वर्षांनी जोरदार कमबॅक, पण महारथी संघाबाहेर

Oxidized Jewellery : नवरात्रीसाठी प्रत्येक मुलीकडे असावीत ‘हे’ ७ प्रकारचे ट्रेंडी ऑक्सिडाइज्ड दागिने

ठाण्यातील पूर्णेकर हत्या प्रकरणाचा पुरावा रायगडात सापडला, सत्य येणार बाहेर; SITच्या हाती काय लागलं?

SCROLL FOR NEXT