Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: फक्त ६ दिवस! लाडक्या बहिणींनो मुदतीपूर्वी KYC करा, कोणती कागदपत्रे आवश्यक, स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या

Ladki Bahin Yojana eKYC Process: लाडकी बहीण योजनेत ई केवायसी करण्यासाठी फक्त ६ दिवस उरले आहेत. त्यामुळे ज्या महिलांनी अजूनही केवायसी केले नाही त्यांनी मुदतीपूर्वी ही प्रोसेस पूर्ण करावी.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेत केवायसीसाठी डेडलाइन

लाडकी बहीण योजनेत केवायसी कशी करायची?

केवायसीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक

महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना खूप लोकप्रिय झाली आहे. आता लाडकी बहीण योजनेत महिलांना इथून पुढे लाभ घ्यायचा असेल तर केवायसी करणे अनिवार्य केले आहे. महिलांना ऑनलाइन पद्धतीने ई केवायसीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करायची आहे. या केवायसीसाठी शेवटची तारीख देण्यात आली आहे. त्याआधी तुम्हाला हे काम करायचे आहे अन्यथा तुम्हाला योजनेअंतर्गत पुढचा लाभ मिळणार नाही.

लाडकी बहीण योजनेत केवायसीची अंतिम तारीख (Ladki Bahin Yojana KYC Deadline)

लाडकी बहीण योजनेत केवायसी करण्याची अंतिम तारीख ही १८ नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे. १८ सप्टेंबर रोजी आदिती तटकरेंनी केवायसीची घोषणा केली होती आणि त्यासाठी पोर्टलदेखील सुरु केले होते. त्यानंतर दोन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. आता १८ नोव्हेंबरआधी तुम्हाला लाडकी बहीण योजनेत केवायसी पूर्ण करायची आहे. जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला १५०० रुपये मिळणार नाहीयेत.

लाडकी बहीण योजना केवायसी प्रोसेस (Ladki Bahin Yojana KYC Process)

लाडकी बहीण योजनेतील केवायसी प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाइन आहे. केवायसीसाठी लाभार्थी महिलांसोबत त्यांच्या पती किंवा वडिलांचीही केवायसी करणे अनिवार्य आहे. त्यामुळे तुमच्याजवळ वडिलांचे किंवा पतीचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.

  • केवायसी करण्यासाठी सर्वात आधी https://www.ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc या वेबसाइटवर जायचे आहे.

  • तिथे तुम्हाला केवायसी असा ऑप्शन दिसणार आहे त्यावर क्लिक करा.

  • यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि लिंक असलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे. जर तुमची केवायसी पूर्ण झाली असेल तर तसा मेसेज दिसेल. जर नसेल झाली तर पुढची प्रोसेस सुरु होईल.

  • यानंतर तुम्हाला तुमच्या पतीचे किंवा वडिलांचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे.

  • यानंतर त्यांच्या फोनवर ओटीपी येईल. तो ओटीपा टाकावा.

  • यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील, त्याची माहिती द्या. यानंतर तुम्हाला केवायसी पूर्ण झाली आहे, असा मेसेज येईल.

कोणती कागदपत्रे आवश्यक (Ladki Bahin Yojana KYC Documents Required)

लाडकी बहीण योजनेत केवायसीसाठी आधार कार्ड, महिलेचा फोटो, रेशन कार्ड, उत्पन्नाची माहिती, आधार कार्ड नंबर लागणार आहे. याचसोबत जर महिलेचा जन्म परराज्यात झाला असेल तर पतीचे रेशन कार्ड, ओळखपत्र आवश्यक आहे. याचसोबत तुमच्या पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EXIT POLL मध्ये महायुतीची सरशी; अंदाज जाहीर होताच रंगली राज ठाकरेंबाबत फडणवीसांनी केलेल्या भविष्यवाणीची चर्चा

Friday Horoscope : मंदिरात जाऊन अन्नपदार्थ दान करावेत; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात मोठं काही तरी घडणार

आयोगानं वापरलं शाईऐवजी मार्कर; मतदानाची शाई एका मिनिटात गायब

Municipal Election: केंद्रावर जाण्याआधीच दुसऱ्याच कुणी बोगस मतदान केलं; मतदाराला बॅलेटवर मतदानाची संधी, कुठे घडला प्रकार?

महापालिका निवडणुकांचं मतदान होताच ZP ची तयारी सुरु; राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेच्या बड्या नेत्यांची गुप्त बैठक

SCROLL FOR NEXT