Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडकीच्या जुलैच्या हप्त्याची तारीख ठरली, पण ऑगस्टचे ₹१५०० कधी येणार?

Majhi Ladki Bahin Yojana August Installment Update: लाडकी बहीण योजनेत जुलैचा हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी येणार आहे. पण ऑगस्टचा हप्ता कधी येणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता रक्षाबंधनच्या दिवशी

जुलैचा हप्ता लांबणीवर

ऑगस्टचा हप्ता कधी जमा होणार

लाडकी बहीण योजना खूप जास्त चर्चेत आली आहे. पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर गेला आहे. जुलैच्या हप्त्याचे पैसे ऑगस्टमध्ये दिले जाणार आहेत. ९ ऑगस्ट म्हणजेच रक्षाबंधनाच्या मूहूर्तावर महिलांना हे पैसे दिले जाणार आहेत. दरम्यान, लाडकी बहीण योजनेत जुलैच्या हप्त्याची तारीख तर समोर आली मात्र ऑगस्टचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे.

९ ऑगस्टला येणार जुलैचा हप्ता (Ladki Bahin Yojana July Month Installment Come On 9th August Raksha bandhan)

लाडक्या बहि‍णींना रक्षाबंधनाच्या दिवशी भेट मिळणार आहे. रक्षाबंधनच्या दिवशी लाडकी बहीण योजनेचा जुलैचा हप्ता जमा केला जाणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हप्ते लांबणीवर जात आहे. दरम्यान, या महिन्यातदेखील हे पैसे उशिराने येत आहे.

ऑगस्टचा हप्ता कधी येणार? (Ladki Bahin Yojana August Month Installment Update)

जुलैचा हप्ता ९ तारखेला येणार आहे. परंतु ऑगस्टच्या हप्त्याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. ऑगस्टचा हप्ता कदाचित महिनाअखेरीस येऊ शकतो. मात्र, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दर महिन्याला शेवटच्या आठवड्यात पैसे जमा केले जातात. त्यामुळे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात १५०० रुपये जमा होण्याची अपेक्षा आहे. याबाबत लवकरच अधिकृत माहिती दिली जाईल.

४२ लाख लाडक्या बहि‍णी अपात्र

लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत ४२ लाख महिलांना बाद करण्यात आले आहे. या महिलांना आता योजनेचे पैसे मिळणार नाहीत. या महिलांनी निकषांबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे त्यामुळे त्यांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. अनेकांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त तर अनेक महिला सरकारी कर्मचारी निघाल्या आहेत. याचसोबत इतर सरकारी योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना या योजनेतून बाद करण्यात आले आहे.

लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता कधी येणार?

लाडकी बहीण योजनेत जुलैचा हप्ता ९ ऑगस्ट म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी देण्यात येणार आहे.

लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार आहे?

ऑगस्टचा हप्ता महिनाअखेरीस जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.

लाडकी बहीण योजनेतून किती महिला अपात्र ठरल्या?

लाडकी बहीण योजनेतून तब्बल ४२ लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. त्यांना यापुढे पैसे मिळणार नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi Skin Care Routine: काय आहे पंतप्रधानाचं Skin Care Routine? हरलीन देओलने प्रश्न विचारताच मोदींचं भन्नाट उत्तर

Actor Death: KGF सुपरस्टारचं निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी; सिनेसृष्टीवर शोककळा

Maharashtra Municipal Corporation Election : महापालिका निवडणुका कधी होणार? एकनाथ शिंदेंच्या नेत्याने थेट तारखा सांगितल्या

Stressful Situation : भरपूर ताण येतो अन् डोके दुखते, मग आजपासूनच करा 'या' गोष्टी

Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का; ऐन निवडणुकीत बड्या नेत्याने साथ सोडली, 'घड्याळ' हाती बांधलं

SCROLL FOR NEXT