Women await the July ₹1,500 Ladki Bahin Yojana installment in Maharashtra. google
बिझनेस

Ladki Bahin Yojana : '३ दिवसात जुलै संपणार, ₹१५०० चा हप्ता कधी जमा होणार?'; 'या' तारखेबाबत समोर आली मोठी अपडेट

Ladki Bahin Yojana July Installment: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या ₹१५०० हप्त्याबाबत लाभार्थी महिलांमध्ये उत्सुकता वाढली आहे. जुलै संपत आला असतानाही अधिकृत घोषणा झालेली नाही.

Namdeo Kumbhar

Ladki Bahin Yojana July Installment Date Update: राज्य सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'च्या पुढील हप्त्याबाबत लाभार्थी महिलांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. जुलै महिना संपण्यासाठी अवघे ३ दिवस शिल्लक राहिले आहेत, मात्र जुलै महिन्याचा हप्ता खात्यात कधी जमा होणार? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे राज्यभरातील लाडक्या बहिणींचे लक्ष आता सरकारच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे.

मागील हप्ता कधी जमा झाला होता?

योजनेच्या नियमांनुसार, महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. यापूर्वी जून महिन्याचा हप्ता १५ जुलै रोजी महिलांच्या बँक खात्यात थेट डीबीटी (DBT) द्वारे वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर आता जुलै महिन्याचा हप्ता मिळण्याची वेळ आल्याने महिलांची प्रतीक्षा वाढली आहे.

१५ ऑगस्टपूर्वी हप्ता मिळण्याची शक्यता

सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, जुलै महिन्याचा हप्ता १५ ऑगस्टपूर्वी महिलांच्या खात्यात जमा केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण याबाबत राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत किंवा सार्वजनिक घोषणा करण्यात आलेली नाही. सरकारच्या शासन निर्णयानुसार (GR) दरमहा १० तारखेपर्यंत हप्त्याची रक्कम वितरीत करण्याचे नियोजन असते. त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच यावर अंतिम निर्णय होणे अपेक्षित आहे.

कधी होणार निर्णय?

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जुलै महिन्याच्या हप्त्याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर लगेचच निधी वितरणाची प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते. लाडक्या बहिणींच्या खात्यात जुलै महिन्याची ही रक्कम वेळेत जमा करण्यासाठी प्रशासन पातळीवर हालचाली सुरू असून, लवकरच सरकारकडून यासंदर्भात अधिकृत स्पष्टीकरण दिले जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Accident: काळरात्र! नवरात्रीत दर्शनासाठी निघालेल्या भाविकांना चिरडले, १२ जणांचा मृत्यू, २९ जखमी

Mumbai : मुंबईत रात्री गोळीबाराचा थरार; ओलामधून आले अन् ३ राऊंड फायर, उत्तर प्रदेश कनेक्शन समोर

Festive Season Deals : दिवाळी की दसरा? कार खरेदीसाठी कोणता सण निवडाल?

Sunday Horoscope: रखडलेली कामं पूर्ण करा, ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार; वाचा राशीभविष्य

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

SCROLL FOR NEXT