Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: फेब्रुवारी संपत आला तरी जानेवारीचा हप्ता नाही, ₹१५०० न येण्यामागचं कारण काय? वाचा

Ladki Bahin Yojana January Installment Delay Reason: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता फेब्रुवारी महिना संपत आला तरीही जानेवारीचे पैसे जमा झालेले नाहीत. पैसे जमा न होण्यामागची कारणे समोर आली आहेत.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार?

₹१५०० रुपये न जमा होण्यामागची कारणे

जानेवारीच्या हप्त्यासाठी सरकारची महत्त्वाची पाऊले

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या मनात नाराजी निर्माण झाली आहे. आता पुढच्या ८ दिवसात फेब्रुवारी महिनादेखील संपेल तरी अजूनही जानेवारीचाच हप्ता जमा झालेला नाही. लाडकी बहीण योजनेत गेल्या अनेक महिन्यांपासून हप्ता लांबणीवर जात आहे. आतादेखील जानेवारीचा हप्ता जवळपास महिनाभर लांबणीवर गेला आहे. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान, आता जानेवारीचा हप्ता न येण्यामागची कारणे समोर आली आहेत.

लाडक्या बहि‍णींना जानेवारीचा हप्ता का आला नाही? (Ladki Bahin Yojana January Installment Delay Reason)

लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या हप्त्यासाठी अजून निधी जमा झालेला नाही. वेगवेगळ्या विभागाकडून हा निधी जमा केला जातो. यानंतर या निधीतून योजनेच्या लाभार्थ्यांना पैसे दिले जातात. दरम्यान, अजूनही हा निधी उपलब्ध झाला नाहीये, त्यामुळेच महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. पैसे जमा होण्यास उशिर लागू शकतो, याबाबत टाइम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे.

जानेवारीच्या हप्त्याबाबत महत्त्वाची पाऊले

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सरकारने महत्त्वाची पाऊले उचलली आहे. आता जानेवारी महिन्याच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागानं ९८.४५ कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाला वर्ग केला आहे. याबाबत निर्णय जारी करण्यात आला आहे, यानंतर आता महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील, असं सांगितलं जात आहे.

जानेवारीचा हप्ता कधी मिळणार? (Ladki Bahin Yojana January Installment Date)

लाडकी बहीण योजनेत जानेवारीचा हप्ता लांबणीवर गेला आहे. आता फेब्रुवारी महिना संपण्याआधी पैसे येऊ शकतात. दरम्यान, आता जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु हे पैसे कधी जमा होणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT