Ladki Bahin Yojana Saam tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: उरले शेवटचे ४ दिवस!लाडक्या बहि‍णींना जानेवारीचे ₹१५०० कधी येणार? तारीख आली समोर

Ladki Bahin Yojana January Installment Date: लाडकी बहीण योजनेत जानेवारीचा हप्ता येण्यास उशिर झाला आहे. पुढच्या महिन्यात महिलांच्या खात्यात जानेवारीचा हप्ता जमा केला जाऊ शकतो.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या हप्त्याबाबत अपडेट

या दिवशी जमा होऊ शकतो जानेवारीचा हप्ता

पुढच्या महिन्यात येणार ₹१५००

जानेवारी महिना संपत आला आहे. जानेवारीच्या महिन्याचा शेवटचा आठवडा सुरु झाला तरीही महिलांना अजूनही हप्ता मिळालेला नाही. लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात जानेवारीचे पैसे जमा झालेले नाहीत. दरम्यान, हा हप्ता पुढच्या म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. जिल्हा परिषद निवडणुकीआधी महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकतात.

या दिवशी खात्यात जानेवारीचा हप्ता येण्याची शक्यता

लाडकी बहीण योजनेत डिसेंबरचा हप्तादेखील उशिरा देण्यात आला होता. जानेवारीचा हप्तादेखील उशिरा येणार आहे. जानेवारी महिन्यात तर पैसे येण्याची शक्यता फार कमी आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, अजूनही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. लवकरच याबाबत घोषणा केली जाईल.

या तारखेला खात्यात जमा होतील ₹१५००

राज्यातील जिल्हा परिषद निवडणुका या ५ फेब्रुवारी रोजी होणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानाआधीच महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. याआधीही महापालिका निवडणुकीआधी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले होते. त्यामुळे सरकार निवडणुकीच्या आधी खात्यात पैसे जमा करु शकतात.

लाडकीला केवायसीसाठी मुदतवाढ

लाडकी बहीण योजनेत महिलांच्या केवायसीमध्ये अनेक अडचणी समोर आल्या आहेत. केवायसी करताना अडचणी आल्याने महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. दरम्यान, आता महिलांची प्रत्यक्ष केवायसी केली जाणार आहे. महिलांच्या घरोघरी जाऊन अंगणवाडी सेविका पडताळणी करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते रायगडमध्ये झेंडावंदन

Post Office Recruitment: भारतीय डाक विभागात सर्वात मोठी भरती; २८,७४० पदे भरली जाणार; पात्रता फक्त १०वी पास

Ajit Pawar : मुंब्र्यात राजकारण तापलं, अजित पवारांच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला; धारदार शस्त्राने वार केले अन्...

MHADA Lottery: म्हाडाच्या ३००० घरांची लॉटरी मार्चमध्ये, मुंबईत हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार; लोकेशन काय?

Fertility Signs: तुमचं शरीर आई होण्यास आहे तयार? हाय फर्टाइल महिलांमध्ये दिसून येतात ही लक्षणं

SCROLL FOR NEXT