Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना जानेवारीचे ₹१५०० आले, फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार? वाचा सविस्तर

Ladki Bahin Yojana February Installment Date: लाडकी बहीण योजनेत जानेवारीचा हप्ता जमा करण्यात आला आहे. त्यानंतर आता फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची बातमी

जानेवारीचा हप्ता जमा

फेब्रुवारीचे पैसे कधी येणार?

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना आनंदाची बातमी मिळाली आहे. लाडक्या बहि‍णींच्या खात्यात जानेवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महिलांना एका महिन्याचे पैसे मिळाले आहे. त्यानंतर आता फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न विचारला जात आहे.

फेब्रुवारी महिना संपायला अवघे २ दिवस उरले आहेत. तरीही फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. जानेवारीचा हप्ता हा लांबणीवर गेला होता. त्यानंतर आता फेब्रुवारीचा हप्तादेखील लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

फेब्रुवारीचा हप्ता लांबणीवर जाणार (Ladki Bahin Yojana February Installment to Delay)

लाडकी बहीण योजनेत महिलांना जानेवारीचे पैसे दिले आहेत. हा हप्ता एक महिनाभर लांबणीवर गेला आहे. जानेवारीचा हप्ता जमा होण्यासाठी अजून २ दिवसांचा कालावधी लागेल. तोपर्यंत फेब्रुवारीचा हप्ता जमा होऊ शकत नाही. त्यामुळे हा हप्ता लांबणीवर जाणार हे निश्चित झाले आहे. मात्र, फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

एकीकडे जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता एकत्र येईल, अशा चर्चा सुरु होती. मात्र, फक्त एकाच महिन्याचा हप्ता जमा झाल्याने महिलांमध्ये निराशा निर्माण झाली आहे. आता महिलांना अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. याचसोबत काही महिलांनाच या योजनेचा हप्ता मिळाला आहे. ज्या महिलांनी केवायसी पूर्ण केली आहे त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT