Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर! या दिवशी येणार जानेवारीचे ₹१५००; संभाव्य तारीख वाचा

Ladki Bahin Yojana January Installment 1500 Rupees Come on These Date: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता पुढच्या महिन्यात येऊ शकतो.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट

लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता कधी येणार?

झेडपी निवडणुकीआधी पैसे येण्याची शक्यता

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आता डिसेंबरपर्यंतचा हप्ता देण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेत महिला आता जानेवारीच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. जानेवारीचा हप्ता कधीपर्यंत येणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता जिल्हा परिषद निवडणुकीआधी येण्याची शक्यता आहे.

झेडपी निवडणुकीआधी येणार जानेवारीचा हप्ता (Ladki Bahin Yojana January Installment Come Before ZP Election)

लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता महापालिका निवडणुकीआधी देण्यात आला होता. त्यानंतर आता पुढचा म्हणजेच जानेवारीचा हप्ता झेडपी निवडणुकीआधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका ५ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या निवडणुकांचा निकाल ७ फेब्रुवारी रोजी लागणार आहे. त्याआधी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. त्यामुळे पुढच्या २० दिवसात महिलांना पैसे मिळतील.

या महिलांनाच मिळणार ₹१५०० (Ladki Bahin Yojana Only These Women Will Get ₹1500)

लाडकी बहीण योजनेचा मागच्या डिसेंबर महिन्याचा हप्ता काही महिलांनाच आला होता. अनेक महिलांना हप्ता देण्यात आलेला नाही. लाभार्थ्यांना केवायसी करणे अनिवार्य केले होते. जर केवायसी केले नाही तर योजनेचा लाभ बंद केला जाईल. तसेच योजनेच्या निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांचाही लाभ बंद केला जाणार आहे. ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

लाडकी बहीण योजनेत डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु होती. त्यानंतर एकाच महिन्याचा हप्ता देण्यात आला होता. यामुळे अनेक महिलांच्या मनात निराशा निर्माण झाली होती. पण आता जिल्हा परिषद निवडणुकीआधी पैसे येणार असल्याची चर्चा सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT