Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना खूशखबर! लाडकीला मिळणार बिनव्याजी कर्ज?

Ladki Bahin Yojana News : आता लाडक्या बहीणींना थेट बिनव्याजी कर्ज मिळणार आहे... मात्र हे कर्ज नेमकं किती असणार आहे? पाहूयात लाडक्या बहीणींसाठीची खुशखबर.....

Yash Shirke

सुप्रिम म्हसकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

लाडक्या बहिणींना दर महिन्याला दीड हजाराचा हप्ता दिल्यानंतर आता विनब्याजी कर्ज देण्याची योजना आखण्यात येत आहे...या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना चक्क शून्य टक्के व्याजदराने 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी मुंबै बँक प्रयत्न करणार असल्याचं मुंबै बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी सांगितलंय.

शासनाच्या चार महामडंळातील विविध योजनांमधून कर्जावर सवलत देण्यात येणार आहे. पर्यटन महामंडळाची आई योजनेसह अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, भटक्या विमुक्तांसाठीचं महामंडळ आणि ओबीसी महामंडळांच्या योजनांमधून व्याजाचा परतावा महिलांना दिला जातो. ज्या लाभार्थी महिला या योजनेत बसत असतील, त्या महिलांना शून्य टक्के व्याजदरात कर्ज उपलब्ध होऊ शकतं, व्याजाचा परतावा संबंधित महामंडळाकडून मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे, असं मुंबै बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत चारही महामंडळाचे संचालक आणि संबंधित खात्याच्या सचिवांची बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या योजनेला मंजुरी दिली आहे. एका महिलेला 1 लाखापर्यंत कर्ज मिळू शकतं. त्यात 5 ते 10 महिला एकत्र येऊन व्यवसाय करू शकतात हा या योजनेमागे उद्देश आहे. त्यामुळे लाडकीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारचे सुरु असलेले प्रयत्न किती यशस्वी होतायेत ते पाहणे महत्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात बेशिस्त बाइकस्वारांना विदेशी पाहुण्यांनी शिकवला धडा, VIDEO व्हायरल

मोठी बातमी! जामखेडमधील हॉटेलवर अंदाधूंद गोळीबार, रोहित पवारांच्या पायाला लागली गोळी

Papad Curry Recipe : रोजची भाजी खाऊन कंटाळलात? मग, झटपट बनवा 'पापड करी'

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यासोबत झोपेत भयंकर घडलं; डोक्यावरचे आणि भुवयांवरचे केस कापले|VIDEO

ED Raid : ईडीची सर्वात मोठी कारवाई; ३५०० कोटींच्या १६० मालमत्ता जप्त, नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT