Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे ३००० रुपये आले की नाहीत? सोप्या स्टेप्सने लगेच तपासा

Ladki Bahin Yojana Status: लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या अकाउंटला दर महिन्याला १५०० रुपये जमा केले जातात. या योजनेत पैसे आलेत की नाही ते कसं चेक करायचं ते जाणून घ्या.

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही खूप लोकप्रिय झाली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना सरकारकडून दर महिन्याला १५०० रुपये मिळतात. दर महिन्याचे १५०० म्हणजे वर्षाला १८००० रुपये महिलांच्या खात्यात जमा होतात. लाडकी बहीण योजनेचे पैसे अद्यापही काही महिलांना आले नाही. तर त्यांनी आपल्याला पैसे आलेत की नाही हे कसं चेक करावं याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

आतापर्यंत ३ महिन्याचे हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. त्यानंतर आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अॅडव्हान्स दिला जाणार आहे.१० ऑक्टोबरपूर्वी म्हणजेच दिवाळीपूर्वी महिलांना ३००० दिले जाणार आहेत. या योजनेत काही महिलांच्या खात्यात ५ महिन्याचे ७५०० रुपये आले आहेत तर काही महिलांच्या खात्यात एकही रुपया जमा झाला नाही. तर तुमच्या अकाउंटला पैसे आलेत की नाही हे चेक करण्याची सोपी ट्रिक आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (How to Check Ladki Bahin Yojana Money Recive Or Not)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांचे बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे. जर तुमचा अर्ज अप्रुव झाला आहे परंतु तुमचे बँक खाते आणि आधार कार्ड सिडिंग नसेल तर पैसे जमा होण्यास अडचणी येतात. त्यामुळेच तुम्ही तुमचे बँक अकाउंट आणि आधार कार्ड सिडिंग आहे का हे चेक करा.अनेक महिलांचे एकापेक्षा जास्त अकाउंट आहेत. त्यामुळे ज्या खात्यात तुमचे आधार कार्ड आणि अकाउंट सिडिंग आहे त्या खात्यात थेट पैसे जमा होतात. अशावेळी महिलांना मेसेज येत नाही. त्यामुळे तुमच्या खात्यात पैसे जमा झालेत की नाही हे कसं चेक करायचं ते जाणून घ्या.

बँकेत पैसे जमा झालेत की नाही असं चेक करा

सर्वप्रथम तुम्ही तुमचे बँक खाते आणि आधार कार्ड सिडिंग आहे का हे चेक करा.

त्यासाठी https://uidai.gov.in/en/ या वेबसाइटला भेट द्या.

या वेबसाइटवर My Aadhar वर क्लिक करा.

त्यानंतर Aadhar Services मध्ये जाऊन बँक सिडिंग स्टेट्सवर क्लिक करा. येथे क्लिक केल्यानंतर लॉग इन ऑप्शन तुम्हाला दिसेल.

यानंतर तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि त्याला लिंक असलेला मोबाईल नंबर टाका.

यानंतर तुम्हाला Bank Seeding Status वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल,

या मेसेजमध्ये तुमचे बँक खाते आणि आधार कार्ड लिंक झाले असल्याची माहिती असेल. त्यानंतर तिथेच दिलेल्या बँक अकाउंटवर तुमचे पैसे आले असतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MPSC Exam 2025 Date : महत्वाची बातमी! MPSC परीक्षा पुढे ढकलली, आता या तारखेला होणार परीक्षा

Asia Cup 2025 Final: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाला धक्का; फायनलमध्ये सूर्यकुमार यादव खेळणार की नाही?

Maharashtra Live News Update: - धुळे येथील बंधाऱ्याच्या भिंतीची उंची अधिकाऱ्यांनी कमी केल्यामुळे याचा फटका शेतकरी व ग्रामस्थांना

नाचणाऱ्या कलेक्टरविरोधात वातावरण तापलं, शेतकरी-पोलीस आमने-सामने, VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, संपूर्ण स्पर्धेवर टाकला बहिष्कार

SCROLL FOR NEXT