Ladki Bahin Yojana Saam Digital
बिझनेस

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण'चे पैसे तुमच्या खात्यात आले नाहीत, आता पुढे काय कराल? वाचा पर्याय

Ladki Bahin Yojana First Installment: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात पहिला हप्ता जमा झाला आहे. काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. या महिला अॅपवर जाऊन तक्रार करु शकतात.

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत लाखो महिलांनी अर्ज केले आहेत. या योजनेचा पहिला हप्ता अनेक महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. या योजनेत दोन महिन्यांचा हप्ता एकाच वेळी महिलांना देण्यात आला आहे. योजनेअंतर्गत अनेक महिलांच्या खात्यात ३ हजार रुपये जमा झाले आहेत. मात्र, हे पैसे काहीच महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. अनेक महिलांच्या खात्यात एकही रुपया जमा झाला नाही. त्यामुळे ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही त्या महिला तक्रार करु शकतात.

तुमच्या खात्यात पैसे जमा न झाल्यास अशा पद्धतीने करा तक्रार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर तुमच्याही अकाउंटला पैसे जमा झाले नसतील तर घाबरुन जाऊ नका. याबाबत तुम्ही तक्रार करु शकतात. हेल्पलाइन नंबर १८१ वर फोन करुन तुम्ही याबाबत माहिती देऊन तक्रार नोंदवू शकतात.

याचसोबत महिला नारी शक्ती दूत अॅपवर जाऊन तक्रार करु शकतात.या अॅपवरुन तुम्हाला पैसे आले नाही, असं सांगून लेखी तक्रार करु शकतात. तसेच महिला अंगनवाडी केंद्रात जाऊन पैसे जमा झाल्याची तक्रार नोंदवू शकतात.

या तारखेला जमा झाला पहिला हप्ता

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता १५ ऑगस्ट रोजी महिलांच्या खात्यात जमा झाला. ३००० रुपये महिलांच्या अकाउंटला जमा झाले होते. या योजनेत आतापर्यंत ८० लाख महिलांनी अर्ज केला आहे. या योजनेत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकाचवेळी जमा करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Accident : मुंबईच्या पॉश एरियात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना उडवले, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू

Maharashtra Politics: राज ठाकरे इंडिया आघाडीत येणार? राज्यात नवं राजकीय समीकरण?

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

रात्री उशिरा चहा पिण्याची सवय आरोग्यासाठी फायदेशीर की घातक? जाणून घ्या

Maharashtra Drought : शेतकऱ्यांकडून कर्जवसुली नाही, नवीन बांधकामांवर निर्बंध; राज्य सरकारचे मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT