Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी होणार; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Ladki Bahin Yojana eKYC Update: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांची आता प्रत्यक्षरित्या पडताळणी केली जाणार आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

केवायसी करुनही पैसे न मिळाल्याने महिलांमध्ये नाराजी

आता महिलांची प्रत्यक्ष पडताळणी होणार

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले होते. अनेक महिलांनी केवायसी करुनदेखील त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. यामुळे महिलांनी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, आता लाडक्या बहि‍णींची पडताळणी करण्याच्या केवायसीबाबत पडताळणी करण्याच्या सूचना देण्यात आले आहे.

लाडकी बहीण योजनेत अनेक महिला निकषात असूनदेखील केवायसीतील काही अडचणींमुळे त्यांचा लाभ बंद झाला आहे. यामुळेच योजनेच्या निकषानुसार लाभार्थ्यांना अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी याबाबत माहिती दिली आहे.

ई केवायसी करुनही पैसे न आलेल्या महिलांची प्रत्यक्ष तपासणी होणार

लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२५ होती. तोपर्यंत महिलांनी केवायसी केली आहे. तरीही अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे महिलांनी मुख्यमंत्र्‍यांनादेखील पत्र लिहलं होतं. याच पार्श्वभूमीवर आता सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

लाडकी बहीण योजनेत केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडल्यामुळे महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. आता या लाभार्थ्यांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांद्वारे प्रत्यक्ष पडताळणी (Physical Verification) केली जाणार आहे. यामुळे आता अंगणवाडी सेविका महिलांच्या घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहे. त्यानंतर पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत.

कोणत्या निकषांची पडताळणी होणार

लाडकी बहीण योजनेसाठी काही निकष ठरवून देण्यात आले आहेत. या निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. यामध्ये २१ ते ६० वयोगटातील महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे, चारचाकी वाहन नसावे. या सर्व निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhirendra Shastri: 'जिस दिन तिरंगे में चांद आ गया उस दिन...; धीरेंद्र शास्त्री नेमकं काय म्हणाले?

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अजित पवारांचं टेन्शन वाढलं; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा भावासह भाजपमध्ये प्रवेश

उमेदवारीसाठी आधी वेट अँड वॉच, निवडणुका होताच ठाकरेंनी किशोरी पेडणेकरांना दिली मोठी जबाबदारी|VIDEO

Maharashtra Live News Update: जिल्हा परिषद निवडणूक प्रकरणावर आज सुनावणी झालीच नाही

Skin Care : तुमची त्वचा ड्राय होते? मग ट्राय करा 'या' नॅचरल फेशियल टिप्स

SCROLL FOR NEXT