Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana : eKYC करायची कशी? वेबसाइट चालेना, OTP येईना; लाडक्या बहिणींसह भावांचाही थेट मंत्र्यांना सवाल

Ladki Bahin Yojana KYC: लाडकी बहीण योजनेत केवायसी सुरु झाली आहेत. दरम्यान, केवायसी करताना अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. वेबसाइट सुरु होत नाही, ओटीपी येत नाही, त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी अनिवार्य

केवायसी करताना तांत्रिक अडचणी

वेबसाइट लोड होत नाही, केवायसी कशी करायची? आदिती तटकरेंना सवाल

लाडकी बहीण योजनेत ऑक्टोबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे.याबाबत स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी दिली आहे. याचसोबत लाडक्या बहि‍णींना केवायसी करण्याचेही आवाहन आदिती तटकरेंनी केलं आहे. आता लाडक्या बहि‍णींना १८ नोव्हेंबरपर्यंत केवायसी करायची आहे.

आदिती तटकरेंनी एक्स या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत याबाबत घोषणा केली आहे. यामध्ये केवायसी करण्याचे आवाहन केले आहे. परंतु केवायसी करताना अनेक अडचणी येत असल्याची तक्रार महिलांनी केली आहे. महिलांनी सांगितलंय की, केवायसी करताना वेबसाइट लोड होत नाही, ओटीपी येत नाही, आम्ही केवायसी करायची कशी असा प्रश्न त्यांनी सांगितले.

आदिती तटकरेंना सवाल

आदिती तटकरेंनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यावर नागरिकांनी कमेंट्स केली आहे. लाडकी बहीण योजनेची वेबसाइट सध्या सुरु नाही, अनेक अर्जदारांना अडचणी येत आहेत. १८ नोव्हेंबर ही शेवटची तारीख असून हा खूप कमी वेळ आहे. याकडे महिला व बालविकास मंत्री मा. आदिती तटकरेंनी लक्ष द्यावे, अशी कमेंट एकाने केली आहे.

अनेकांनी तर पोस्टखाली कमेंट करत स्क्रिनशॉटदेखील शेअर केले आहेत. लाडकी बहीण योजनेची वेबसाइट लोड होत नसल्याचे दिसत आहे.यामुळे केवायसी करण्यात अडचणी येत असल्याचेही अनेकांनी म्हटले आहे.

एकाने कमेंट करत म्हटलंय की, गेले ५ दिवस मी ट्राय करतोय पण होत नाही, आता ई केवायसी कशी करायची, वेबसाइट ओपन होत नाही. अजून एकाने म्हटलंय की, गेले ७-८ दिवस ई केवायसी करण्याचा प्रयत्न करतोय. साइट हँग झाली आहे का तपासून बघा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Health Tips: हिवाळ्यात रात्री हे पदार्थ टाळा; अन्यथा सर्दी-खोकल्याने व्हाल हैराण

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्गात युती नकोच भाजप कार्यकर्त्यांचा स्वबळाचा नारा

Gulmarg Snowfall : निसर्गाचा अद्भुत नजारा, गुलमर्गमध्ये तुफान बर्फवृष्टी पर्यटनासाठी नंदनवन खुलले! | VIDEO

लग्न सराईची लगबग अन् क्षणात अनर्थ घडलं; गॅस सिलिंडरचा स्फोट, टाकीचे तुकडे उडाले, ११ जण जखमी

Success Story : कोरडवाहू शेतकर्‍याचा मुलगा झाला अधिकारी! MPSC मध्ये महाराष्ट्रात टॉप १० मध्ये, अख्खा गावात जल्लोष

SCROLL FOR NEXT