Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: उरले शेवटचे ८ दिवस! लाडक्या बहिणींना eKYCसाठी मुदतवाढ मिळणार का? वाचा सविस्तर

Ladki Bahin Yojana eKYC Deadline may Extended: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत केवायसी करण्यासाठी आता मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती

केवायसीसाठी मुदतवाढ मिळणार?

नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार?

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करण्यासाठी शेवटची तारीख ३१ डिसेंबर निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व लाभार्थी महिलांनी मुदतीपूर्वी केवायसी करायचे आहे. जर तुम्ही डेडलाइनपूर्वी केवायसी केले नाही तर तुमचा लाभ बंद होऊ शकतो. दरम्यान, आता केवायसी करण्यासाठी मुदतवाढ मिळणार का असा प्रश्न विचारला जात आहे.

लाडक्या बहि‍णींना केवायसीसाठी मुदतवाढ मिळणार? (Ladki Bahin Yojana eKYC Deadline May Extended)

लाडकी बहीण योजनेत केवायसी पूर्ण करण्यासाठी अवघे ८ दिवस उरले आहेत. जर तुम्ही त्यापूर्वी केवायसी केले तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, अजूनही लाखो महिलांचे केवायसी बाकी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता सरकार केवायसीसाठी मुदतवाढ देणार का असा प्रश्न विचारला जात आहे.

लाडकी बहीण योजनेत केवायसीसाठी मुदतवाढ देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणूकीच्या काळात ही मुदतवाढ दिली जाऊ शकते. दरम्यान, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळेच अद्याप याबाबत संभ्रम आहे.

लाडकीला नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार? (Ladki Bahin Yojana November Installment)

लाडकी बहीण योजनेत अजूनही नोव्हेंबरचा हप्ता जमा करण्यात आलेला नाही. त्यामुळे महिलांना पैसे कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. डिसेंबर महिनादेखील संपायला आला आहे. त्यामुळे आता जानेवारीचाही हप्ता एकत्र देणार का असा प्रश्न विचारला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: धावत्या लोकलमधून तरुणीला फेकलं, नवी मुंबई हादरली; थरकाप उडवणारा VIDEO समोर

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटेंना दिलासा; आमदारकी रद्द होणार नाही

Kidney Damage: व्हिटॅमिन B12 च्या गोळ्या किडनीचं करतात नुकसान; तज्ज्ञांनी सांगितलेली कारणे एकदा वाचाच

भीषण अपघाताचा थरार! भरधाव बस अचानक उलटली, १६ प्रवाशांचा जागीच मृत्यू

Accident : संभाजीनगरमध्ये कार- रिक्षाचा भीषण अपघात; दोघांनी जागीच सोडले प्राण; गरोदर महिला गंभीर तर बाळाचा पोटात मृत्यू

SCROLL FOR NEXT