Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: eKYC केली, आता लाडक्या बहिणींना जानेवारीचे ₹१५०० कधी मिळणार? वाचा सविस्तर

Ladki Bahin Yojana January Installment Update: लाडकी बहीण योजनेत केवायसी केल्यानंतर लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळणार आहे. केवायसी करुन आता अनेक दिवस झाले त्यामुळे महिलांना पैसे कधी मिळणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार?

ईकेवायसी केली, अजून हप्ता जमा नाही

जानेवारीच्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना डिसेंबर आणि जानेवारीच्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. महिलांना योजनेचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न पडला आहे. दरम्यान, केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महिलांना पैसे मिळतील, अशी अपेक्षा होती. दरम्यान, आता योजनेत केवायसी करण्याची मुदतदेखील संपली आहे तरीही महिलांना पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे आता हप्ता कधी येणार असा प्रश्न पडला आहे.

केवायसी केली, जानेवारीचा हप्ता कधी येणार? (Ladki Bahin Yojana eKYC Done When will January Installment come)

राज्य सरकारने लाडक्या बहि‍णींना केवायसी अनिवार्य केले होते. केवायसी केल्यानंतर फक्त पात्र लाभार्थी महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेत केवायसी केल्यानंतरही अजूनही पैसे जमा झाले नाहीत, त्यामुळे महिलांच्या मनात निराशा निर्माण झाली आहे.

लाडकी बहीण योजनेत केवायसी करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२५ होती. यानंतर महिलांना केवायसी करता येणार नाही, याबाबत आदिती तटकरेंनी ट्विट करत माहिती दिली होती. केवायसीमध्ये फक्त महिला नव्हे तर त्यांच्या पती आणि वडिलांचीही केवायसी करणे अनिवार्य केले होते. आता यापुढे दरवर्षी योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करावी लागणार आहे. जर केवायसी केली नाही तर योजनेचा लाभ बंद होणार आहे.

३० लाख महिलांचा लाभ बंद (30 Lakh Women Will not Get Benefit of Ladki Bahin Yojana)

जवळपास ३० लाख महिलांनी मुदतीपूर्वी केवायसी केली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या महिलांना यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाहीये. त्यामुळे आता डिसेंबर-जानेवारीचा हप्ता या महिलांना मिळणार की नाही, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान,केवायसी केलेल्या महिलांपैकीही फक्त पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, निर्यातीवरील रोड टेप सवलत घटवली

Tuesday Horoscope: प्रेम, करिअर आणि पैसा कमवण्यासाठी नवीन संधी मिळेल, ताण कमी होईल; वाचा राशीभविष्य

Weight Loss Poha: वजन कमी कारायचं आहे आणि चटपटीत पण हवयं? मग सकाळी नाश्त्याला खा 'हे' हेल्दी पोहो

पोलीस महानिरीक्षकांना अटक होणार? पोलीस दलात खळबळ

Lotus Mangalsutra Design: मंगळसूत्राच्या लेटेस्ट डिझाईन्स शोधताय? पाहा या ७ ट्रेंडी कमळ मंगळसूत्र डिझाईन

SCROLL FOR NEXT