Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: उरले शेवटचे २४ तास! लाडक्या बहिणींनो आजच करा हे काम अन्यथा ₹४५०० रुपये विसरा

Ladki Bahin Yojana eKYC Update: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. योजनेच्या लाभार्थ्यांनी केवायसी करायची आहे. केवायसीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी शेवटचे २४ तास उरले आहेत.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी

ईकेवायसी करणे अनिवार्य

केवायसीत दुरुस्ती न केल्यास लाभ कायमचा बंद

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळवण्यासाठी केवायसी करणे अनिवार्य आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी केवायसी केली नाही तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. लाडकी बहीण योजनेत केवायसीमध्ये दुरुस्ती करण्याची शेवटची संधी तुमच्याकडे आहे. तुमच्याकडे फक्त शेवटचा १ दिवस उरला आहे.

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी शेवटची संधी (Ladki Bahin Yojana eKYC Deadline)

लाडकी बहीण योजनेत ईकेवायसी करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर होती. त्याआधी अनेक लाभार्थ्यांनी केवायसी केले. परंतु केवायसी करताना अनेक महिलांना प्रश्न कळले नाही. त्यामुळे त्यांनी चुकीची उत्तरे दिली. याच महिलांना त्यांची चूक सुधारण्याची आणखी एक संधी देण्यात आली आहे. महिलांना केवायसी करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. आता ही मुदत संपण्यासाठी फक्त १ दिवस उरला आहे. तुम्हाला उद्या म्हणजेच ३१ मार्चपर्यंत केवायसी करायची आहे.

केवायसी न केल्यास लाभ बंद

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना केवायसी करणे अनिवार्य आहे. लाखो महिलांनी ३१ डिसेंबरआधी केवायसी केले नाही त्यामुळे त्यांचा लाभ बंद झाला आहे. त्यानंतरही आता ज्या महिलांना केवायसीत दुरुस्ती करण्याची संधी मिळाली आहे त्यांनी जर ते काम केले नाही तर त्यांचा लाभ बंद होणार आहे. याचसोबत लाडक्या बहि‍णींनी यावेळी विचारपूर्वक उत्तरे द्यायची आहेत.

लाडक्या बहि‍णींना मिळणार ₹४५००

लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांची ईकेवायसीत चूक झाली आहे त्यांना ४५०० रुपये मिळणार आहेत. या महिलांचे मागील ३ हप्ते रखडले होते. त्यानंतर महिलांच्या खात्यात आता हे पैसे एकत्र जमा करण्यात येणार आहेत. महिलांना ४५०० रुपये मिळणार आहे. यासाठी केवायसी करणे अनिवार्य आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal Dosh: मंगळमुळे लग्न जमेना! 'या'५ खात्रीशीर उपायांनी दूर होईल मंगळदोष

Parbhani: हनुमान मंदिराचा सभा मंडप कोसळला, ५ जणांचा मृत्यू; मृतांची नावे आली समोर

Masoor Bhaat Recipe: लहान मुलांना डब्ब्यात द्या पौष्टिक आणि चविष्ट मसूर भात, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: राज ठाकरे आणि मराठी माणसांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट,डोंबिवलीत मनसे आक्रमक, तरुणावर कारवाई

चंद्रपूर गुदमरलं! साडेतीन वर्षांत 325 जणांचा मृत्यू; धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT