Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना eKYCसाठी मुदतवाढ! चूक सुधारण्याची संधी मिळणार; वाचा प्रोसेस

Ladki Bahin Yojan eKYC Deadline Extended: लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसीमध्ये झालेली चुक सुधारण्याची संधी मिळणार आहे. आता महिलांची अंगणवाडी सेविकांद्वारे पडताळणी केली जाणार आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेच्या केवायीसाठी मुदतवाढ मिळणार

चूक सुधारण्याची संधी महिलांना मिळणार

केवायसीमधील चुक सुधारल्यानंतर पुन्हा लाभ सुरु होणार

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ईकेवायसी करणे अनिवार्य केले आहे. ई केवायसी करुनदेखील महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही. यामुळे महिलांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. याचसोबत अनेक महिलांनी तांत्रिक अडचणींमुळे, ओटीपी आणि वेबसाइटवर एरर येत असल्याने केवायसी केले नाही.या महिलांचा लाभ तर बंद झालाच आहे. परंतु ज्या महिला पात्र आहेत आणि केवायसी केले नाही त्यांचा लाभ बंद झाला आहे. दरम्यान, आता केवायसीमध्ये दुरुस्ती करण्याचा पर्याय उपलब्ध करुन दिला जाणार आहे.

केवायसीमधील चुकीमुळे लाभ बंद

लाडकी बहीण योजनेत केवायसीमध्ये प्रश्नांची चुकीची उत्तरे दिल्यामुळे महिलांचे लाभ बंद झाले आहेत. याचसोबत ज्या महिला खरंच निकषांमध्ये बसतात त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. राज्यातील जवळपास २५ लाख महिला केवायसी करु शकले नाहीत. त्यांचाही लाभ बंद केला गेला आहे. मात्र, केवायसीमध्ये चुक झालेल्या महिलांना ही चुकी सुधारण्याची संधी मिळणार आहे.

नवीन केवायसी प्रोसेस

लाडकी बहीण योजनेत केवायसीमध्ये माहिती चुकलेल्या महिलांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. अंगणवाडी सेविका महिलांची पडताळणी करणार आहे. अनेक महिलांनी शासकीय नोकरदार असल्याचा पर्याय निवडला आहे. याची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. वस्तुस्थिती तपासून महिलांना ई केवायसीसाठी संधी दिली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

ई केवायसी करताना शासकीय नोकरदार पर्याय निवडल्याने महिलांना योजनेचा लाभ मिळू शकला आहेत. आता शासन स्तरावरुन दुरुस्तीची संधी मिळणार आहे. यासंदर्भातील निर्णय लवकरच होईल. चूक दुरुस्तीनंतर महिलांचा लाभ सुरु होईल. ई केवायसी करायची राहिलेल्या महिलांसाठीही आचारसंहितेनंतर सकारात्म निर्णय होऊ शकतो, असं वैशाली भोसले, प्रभारी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सोलापूर यांनी सांगितलं आहे. याबाबत सकाळने वृत्त दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : संतापजनक! ८९ वर्षाच्या महिलेला रूग्णालयात उंदराने कुरतडले, ICU मधील भयावह घटना

Pune Crime: कॉलेजबाहेर रक्तरंजित थरार! पुण्यात विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला, कोयता डोक्यात घुसला; थरकाप उडवणारा VIDEO

Railway Jobs: खुशखबर! १०वी पास तरुणांसाठी रेल्वेत नोकरीची संधी; २८०१ पदांसाठी भरती; वाचा सविस्तर

IPL 2026: धोनी, रोहित, कोहली...IPL 2026 मधील सर्वात वयस्कर 10 खेळाडूंची यादी पाहिली का?

Amravati : काळजाचा ठोका चुकवणारा अपघात, बाप-लेकीचा जागीच मृत्यू, कारने दुचाकीला ५० फूट उडवले

SCROLL FOR NEXT