Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: E-KYC करताना OTP बाबत तांत्रिक अडचण, आदिती तटकरेंकडून लाडकीला दिलासा, नेमकं काय म्हणाल्या...

Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana KYC: लाडकी बहीण योजनेत केवायसी करताना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे आता आदिती तटकरेंनी यावर उपाय काढला आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेत केवायसी अनिवार्य

लाडकी बहीण योजनेच्या केवायसी करण्यात अडचणी

आदिती तटकरेंनी महिलांना दिले आश्वासन

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. लाडकी बहीण योजनेक आता सर्व लाभार्थी महिलांना केवायसी करावी लागणार आहे. यासाठी दोन महिन्यांता कालावधी देण्यात आला आहे.अनेक महिलांना केवायसी केले आहेत. परंतु अनेक महिलांना केवायसी करण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. महिलांना ओटीपी किंवा तांत्रिक कारणांमुळे केवायसी करता येत नाहीये. यावरच आता आदिती तटकरेंनी उपाय काढला आहे.

महिला व बालविकास विभाग मंत्री आदिती तटकरेंनी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय केवायसी करण्यासाठी एक उपाय काढला आहे. त्यांनी सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे.

आदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या? (Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे E-KYC करताना OTP बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब समोर आली आहे .

महिला व बालविकास विभागाच्या वतीने याची दखल घेण्यात आली आहे. तज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपायोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन E-KYC प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होणार याबाबत मी सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त करते.

त्यामुळे आता लाडक्या बहि‍णींना केवायसी करताना ओटीपी किंवा तांत्रिक अडचणी येणार नाहीत. याबाबत लवकरच तोडगा काढला जाणार आहे. त्यामुळे लाडक्या बहि‍णींसाठी ही दिलासादायक बातमी आहे. लाडक्या बहि‍णींनी कोणत्याही अडचणीशिवाय केवायसी करता येणार आहे.

लाडकी बहीण योजनेच्या केवायसीबाबत अजून एक महत्त्वाचा निर्णय

लाडकी बहीण योजनेच्या केवायसीबाबत आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या पती किंवा वडिलांचीही केवायसी करण्यात येणार आहे. यातून महिलांच्या कुटुंबांच्या उत्पन्नाची माहिती मिळणार आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त नसावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Childhood Cancer: पालकांनो! मुलांमध्ये दिसणारी ही 5 लक्षणं दुर्लक्षित करू नका; कॅन्सरचा असू शकतो सुरुवातीचा संकेत

Maharashtra News Live Update: गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई, 22 लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त

Caramel Custard Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग, घरी बनवा रेस्टॉरंटस्टाईल क्रीमी कॅरॅमल कस्टर्ड, वाचा रेसिपी

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

SCROLL FOR NEXT