Ladki Bahin Yojana: लाडकीची e KYC करण्याचा निर्णय का घेतला? कारण आलं समोर

Ladki Bahin Yojana E kyc Mandatory: लाडकी बहीण योजनेत ई केवायसी करणे अनिवार्य केले आहे. दरवर्षी केवायसी करावी लागणार आहे. दरम्यान, केवायसी करण्याचा निर्णय का घेतला ते जाणून घ्या.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam Tv
Published On
Summary

लाडकी बहीण योजनेअंतर्गत केवायसी अनिवार्य

केवायसी करण्याचा निर्णय का घेतला?

पती आणि वडिलांचीही करावी लागणार केवायसी

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आता केवायसी करणे अनिवार्य केले आहे. ज्या लाडक्या बहिणी केवायसी करणार नाहीत. त्यांचा लाभ बंद केला जाणार आहेत. दरम्यान, आता लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांच्या पती किंवा वडिलांचेही केवायसी केले जाणार आहे. दरवर्षी लाडक्या बहि‍णींची केवायसी केली जाणार आहे. यातून अनेक महिलांचे लाभ बंद केले जाणार आहेत.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! eKYCच्या नावाखाली फेक वेबसाइट; नेमकं सत्य काय?

लाडक्या बहि‍णींची केवायसी करण्याचा निर्णय का घेतला?

लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांनी निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे. या महिलांचा शोध घेण्यासाठीच केवायसी सुरु केली गेली आहे. दरम्यान, काही मयत महिलादेखील आहेत. त्यांनाही योजनेचा लाभ मिळत आहे. अशा सर्व महिलांचे लाभ बंद व्हावेत आणि फक्त खऱ्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळावा, यासाठी केवायसी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा, हा यामागचा उद्देश आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींमुळे ३६१ आमदारांचा निधी रखडला; सरकारी तिजोरीवर ताण; VIDEO

आता पती आणि वडिलांचीही करावी लागणार केवायसी

आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसोबतच त्यांच्या पती किंवा वडिलांचीही केवायसी करावी लागणार आहे. त्यांचीही सर्व माहिती घेतली जाणार आहे. योजनेत एक महत्त्वाचा निकष आहे तो म्हणजे महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त नसावे. त्यामुळेच आता लाभार्थी महिलांच्या वडील आणि पतीच्याही उत्पन्नाची माहिती घेतली जाणार आहे. यातून ज्या महिलांचे उत्पन्न जास्त आहे त्यांचा लाभ बंद केला जाणार आहे. ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. तुम्हाला या योजनेअंतर्गत ऑनलाइन पद्धतीने केवायसी करायची आहे. तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन फॉर्म भरायचा आहे.त्यानंतर तुमची केवायसी पूर्ण होणार आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडकीसाठी महत्त्वाची बातमी! e-KYC साठी सरकारचा आणखी एक नियम, पती किंवा वडिलांची माहिती द्यावीच लागेल, वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com